तुमच्या मोबाइलमध्येही आहेत ‘हे’ धोकादायक 8 अॅप्स? लवकर डिलिट करा अन्यथा बँक खाते होईल रिकामे

MHLive24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भारतासह अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी अचानक लोकप्रिय झाली आहे. बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत. पण जर तुम्ही सुद्धा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थांबा.

अलीकडेच, गुगलने त्याच्या प्ले स्टोअरवरून अशा 8 अॅप्सवर बंदी घातली जी क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होती. जर तुम्ही चुकून हे अॅप्स डाऊनलोड केले असतील तर उशीर न करता ते डिलीट करा. अन्यथा, तुमच्या फोनवर मालवेअर हल्ला होऊ शकतो, त्यानंतर तुमचे बँक खाते रिकामे होईल.

अशा प्रकारे खाते रिकामे होईल :- सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या अहवालानुसार, ‘तपासात असे आढळून आले की 8 धोकादायक अॅप्स जाहिराती दाखवून आणि सबस्क्रिप्शन सेवा (महिन्याला सरासरी 1100 रुपये) आणि अतिरिक्त शुल्क आकारून वापरकर्त्यांची फसवणूक करत आहेत. एकदा पैसे भरल्यानंतर, वापरकर्त्याचे खाते हॅक केले गेले आणि नंतर ठग त्याचे खाते रिकामे करायचे.

Advertisement

ट्रेंड मायक्रोने गुगल प्लेला याबद्दल माहिती दिली, त्यानंतर ती अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकली गेली. तथापि, प्ले स्टोअरमधून काढून टाकल्यानंतरही, हे अॅप्स अद्याप आपल्या फोनमध्ये कार्य करत असतील तर आता तुमचा फोन तपासा आणि ते अॅप्स ताबडतोब डिलीट करा.

‘हे’ आहेत ते अॅप्स

1. बिट फंड्स (BitFunds) – Crypto Cloud Mining
2. बिटकॉइन माइनर (Bitcoin Miner) – Cloud Mining
3. बिटकॉइन Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
4. क्रिप्टो होलीक (Crypto Holic) – Bitcoin Cloud Mining
5. डेली बिटकॉइन रिवार्ड (Daily Bitcoin Rewards) – Cloud Based Mining System
6. बिटकॉइन 2021 (Bitcoin 2021)
7. माइनबिट प्रो (MineBit Pro) – Crypto Cloud Mining & btc miner
8. इथेरियम Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

Advertisement

इतर 120 अॅप्सवर गुगलची नजर :- अहवालात म्हटले आहे की 120 पेक्षा जास्त बनावट क्रिप्टोकरन्सी अॅप्स अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. कंपनीने एका ब्लॉगमध्ये लिहिले, ‘हे अॅप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या नावाखाली लोकांना फसवण्यासाठी इन-अॅप जाहिराती दाखवतात.

या अॅप्सने जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत जगभरातील 4500 हून अधिक वापरकर्त्यांना टार्गेट केले आहे. असे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, कृपया त्याची रिव्यू वाचा. यापूर्वीही गुगलने रशियन सिक्युरिटी फर्मच्या तक्रारीवरून आपल्या प्लॅटफॉर्मवरून 9 पेक्षा जास्त अॅप्स काढून टाकली होती. ती अॅप्स वापरकर्त्यांची फेसबुक खाती हॅक करत होती.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker