तुमच्याकडेही LIC ची पॉलिसी आहे ? वेळीच सावध व्हा अन्यथा पैसे बुडणार, जाणून घ्या

MHLive24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- अनेक लोक LIC मध्ये गुंतवणूक करतात. अनेक कारणामुळे हि गुंतवणूक सुरक्षित मानली गेली आहे.परंतु आता काही अलर्ट LIC कडून देण्यात आले आहेत. देशामध्ये सध्या ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर क्राइमची प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत.

काही भामटे LIC अधिकारी, एजंट किंवा विमा नियामक आयआरडीएचे अधिकारी बनतात आणि ग्राहकांना कॉल करतात. यांच्या जाळ्यात अडकल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या कॉलमध्ये तो विमा पॉलिसीशी संबंधित फायदे अतिशयोक्ती पद्धतीने सांगतो. अशा प्रकारे ते ग्राहकाला विद्यमान पॉलिसी सरेंडर करण्यासाठी तयार करतात.

वैयक्तिक माहिती कोणालाही फोनवर शेअर करू नये :- एलआयसीने आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कोणालाही फोनवर शेअर करू नये. या व्यतिरिक्त, जर कोणत्याही ग्राहकाला काही फसवे कॉल आले, तर ते spuriouscalls@licindia.com वर ईमेल करून तक्रार नोंदवू शकतात.

Advertisement

बनावट कॉल्सपासून सावध राहा :- एलआयसीने आपल्या वतीने जारी केलेल्या अलर्टमध्ये स्पष्टपणे ही माहिती दिली. ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून फोन कॉल उचलू नये. एलआयसीने ग्राहकांना त्यांची पॉलिसी एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवून तेथे सर्व माहिती मिळवण्याची सूचना केलीय. याशिवाय एलआयसीने आपल्या ग्राहकांना अनेक गोष्टींची काळजी घेण्याची विनंती केलीय.

लक्षात ठेवा या गोष्टी

अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा ज्याच्याकडे आयआरडीए द्वारे जारी करण्यात आलेला परवाना आहे किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र (ID) आहे

Advertisement

जर तुम्हाला कोणताही दिशाभूल करणारा कॉल आला तर  co_crm_fb@licindia यावर तक्रार करू शकता.

एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकांकडे आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit
Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker