डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली तरीही तुमचे होणार नाही काहीच नुकसान ; जाणून घ्या ‘ही’ स्कीम

MHLive24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- डिजिटल व्यवहारांमुळे फसवणुकीची अनेक प्रकरणे वाढली आहेत. ग्राहक सायबर फसवणुकीला कधी बळी पडतात हे त्यांनाही कळत नाही.

तुमचे बँक खात्यावर एखाद्या ठगाची नजर पडली आहे आणि त्याने पैसे ऑनलाईन चोरण्याचा प्लॅन केला आहे हे देखील कळणे मुश्किल आहे.

अनेक लोक या प्रकारच्या फसवणुकीला बळी पडले आहेत आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय आणखी काही साध्य झाले नाही. जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकलात तर कार्ड प्रोटेक्शन प्लॅन तुम्हाला खूप मदत करेल.

Advertisement

कार्ड संरक्षण योजना म्हणजे तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा विमा. देशातील अनेक नामांकित बँका ग्राहकांना ही योजना देतात. कार्ड प्रोटेक्शन प्लॅन बँकेकडून दरवर्षी 900 ते 2100 रुपये दराने दिले दिले जात आहेत.

यामध्ये ग्राहकाची फसवणूक झाल्यास नुकसानभरपाईसाठी कव्हर समाविष्ट आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने कार्ड हरवणे किंवा चोरी झाल्यास फसवणूक, सायबर फसवणूक, एटीएम पिनद्वारे फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूक यांचा समावेश आहे.

याद्वारे जर तुमची फसवणूक झाल्यास बँक तुम्हाला आर्थिक सुरक्षा पुरवते. हा प्लॅन घेणाऱ्यांना वेगवेगळ्या बँकांचे कार्ड चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास प्रत्येक बँकेशी स्वतंत्रपणे संपर्क साधण्याची गरज नाही, हरवलेली किंवा चोरी झालेली सर्व कार्ड फक्त एका कॉलद्वारे ब्लॉक केली जातात.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker