सरकारचा मोठा निर्णय: रिटर्न भरला नाही तर 15 ऑगस्टपासून करू शकणार नाहीत ‘हे’ काम

MHLive24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-  करदात्यांनी जून 2021 च्या तिमाहीत दोन महिन्यांसाठी जीएसटी रिटर्न दाखल केले नाही, त्यांना 15 ऑगस्टपासून ई-वे बिल मिळू शकणार नाही, असं जीएसटी नेटवर्कने सांगितलंय. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे ऑगस्टमध्ये कर संकलन वाढण्यास मदत होईल, कारण प्रलंबित जीएसटी रिटर्न भरणे अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने कोरोनामहामारी दरम्यान सवलत देत, नॉन-फाईल करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक ई-वे बिल तयार करण्यावर स्थगित दिली. जीएसटीएनने करदात्यांना म्हटले आहे की, “सरकारने आता 15 ऑगस्टपासून सर्व करदात्यांसाठी ईडब्ल्यूबी पोर्टलवर ई-वे बिल जनरेट करण्यावरील बंदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”

अशाप्रकारे, 15 ऑगस्ट 2021 नंतर सिस्टम फाईल केलेल्या रिटर्नची तपासणी करेल आणि आवश्यक असल्यास ई-वे बिले जनरेट करण्यावर बंदी घालेल. एएमआरजी अँड असोसिएट्सचे सिनिअर पार्टनर रजत मोहन म्हणाले की, जीएसटीएनने जीएसटी रिटर्न फाइल न करणाऱ्या सर्वांवर दबाव वाढवला आहे आणि ई-वे बिलांच्या जनरेटवर स्थगितीमुळे अनेक व्यवसाय ठप्प होतील.

Advertisement

या स्वयंचलित दंडात्मक कारवाईमुळे ऑगस्टमध्ये कर वाढेल, असेही रजत मोहन यांनी सांगितले. वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनानंतर जीएसटी अंतर्गत जारी केलेल्या ई-वे बिलांनीही एक विक्रम केला. जुलैमध्ये 6.4 कोटी ई-वे बिले तयार करण्यात आलीत, जी एप्रिलनंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. एप्रिलमध्ये विक्रमी 7.12 कोटी ई-वे बिले तयार झाली.

वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) च्या आकडेवारीनुसार, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 17.4 टक्के अधिक ई-वे बिले तयार झाली. जूनमध्ये 54.6 मिलियन म्हणजेच 5.46 कोटी ई-वे बिले तयार झाली. त्याच वेळी जूनमध्ये 5.46 कोटी, मे महिन्यात 3.99 कोटी ई-वे बिले तयार झाली.

50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल आवश्यक आहे. जुलै महिन्यात 1 लाख 16 हजार 393 कोटी वस्तू आणि सेवा करातून सरकारी तिजोरीत आले. जुलै 2020 च्या तुलनेत यात 33 टक्क्यांनी वाढ झाली. जुलै 2020 मध्ये जीएसटी संकलन 87,422 कोटी होते. यामध्ये CGST 16,147 कोटी, SGST 21,418 कोटी आणि IGST 42,592 कोटी होते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker