पीएफ मधून पैसे काढताना ‘ही’ चूक टाळाच, अन्यथा 1 लाख काढले तर 11 लाखांचे होईल नुकसान

MHLive24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-  नोकरदारांनी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढू नयेत, असा सल्ला नेहमीच आर्थिक तज्ज्ञ देत असतात. जर तुम्ही सेवानिवृत्तीच्या काही वर्षांपूर्वी हे पैसे काढले, तर समजून घ्या की तुम्ही तुमचे नुकसान करीत आहात. हा फंड तुमच्या भविष्यासाठी आहे आणि या फंडातून 1 रुपये काढल्याने सेवानिवृत्ती निधीवर 11 पट फरक पडतो. सरकारने यासंदर्भात पैसे काढण्याचे नियमही सोपे केलेत.

एका अंदाजानुसार, जर तुम्ही खात्यातून 1 लाख रुपये काढले असतील तर तुम्ही तुमचे 11 लाख रुपये गमावलेत.
अंदाजित कॅल्क्युलेशननुसार जर तुमच्या सेवानिवृत्तीमध्ये ३० वर्षांचा अवधी असेल आणि तुम्ही तुम्ही पीएफ खात्यातून 1 लाख रुपये काढले तर त्याचा तुमच्या सेवानिवृत्तीच्या फंडावर 11.55 लाख रुपयांचा परिणाम होईल.

जास्त गरज नसेल तर पीएफ फंडातून पैसे काढूच नये :- मनी मॅनेजमेंट तज्ज्ञांचे मत आहे की फार महत्त्वाचे नसेल तर पीएफ मधून पैसे काढणे टाळावे. त्याला 8.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. यावेळी, ईपीएफमधून काढलेली रक्कम जितकी मोठी असेल तितका निवृत्तीच्या फंडावर जास्त परिणाम होईल.

Advertisement

किती कट होतो पीएफ ? :- नियमांनुसार, पगार घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पगाराच्या व महागाई भत्ताच्या 12% रक्कम पीएफ खात्यात भरणे बंधनकारक आहे. नियोक्ता देखील कर्मचार्‍याच्या पीएफ खात्यात समान योगदान देतो. निवृत्तीनंतरच ही रक्कम काढली जाते. तथापि, निवृत्तीपूर्वीच पीएफ पैसे काढण्याच्या काही अटी आहेत. पीएफ खात्यात भरलेल्या पैशांच्या आधारावर व्याज दिले जाते.

मागील काही महिन्यांत 30,000 कोटी रुपये काढले :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यांत लोकांनी पीएफकडून एकूण 30,000 कोटी रुपये काढले आहेत. पैशाचे समस्या असणारे लोक पीएफमधून पैसे काढत आहेत आणि त्यांच्या गरजा पूर्ण करीत आहेत. एका अहवालानुसार एप्रिल ते जुलै या कालावधीत 80 लाख ग्राहकांनी ईपीएफओमधून पैसे काढले आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker