पीएम मोदींच्या ‘त्या’ योजनेअंतर्गत 16,488 घरे बांधण्यास मंजुरी, लवकर करा अर्ज अन मिळावा लाखोंचा फायदा

MHLive24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY-U) केंद्र सरकारने शहरी भागात 16,488 घरे बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. वास्तविक, पीएम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार बेघर लोकांना घरे बनवून देते.

यासह, या योजनेअंतर्गत जे लोक कर्जावर घर किंवा फ्लॅट खरेदी करतात त्यांनाही अनुदान उपलब्ध आहे. सरकारच्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीची 54 वी बैठक झाली. या बैठकीत 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.

PMAY मध्ये अर्ज कसा करावा ?

Advertisement

1. पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सरकारी अॅप डाउनलोड करू शकता आणि लॉगिन आयडी तयार करू शकता.
2. आता हे अॅप तुमच्या मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड पाठवेल.
3. याच्या मदतीने लॉग इन केल्यानंतर, आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
4. PMAY G अंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थींची निवड करते.
5. यानंतर लाभार्थ्यांची अंतिम यादी PMAYG च्या वेबसाइटवर टाकली जाते.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो ? :- पीएम आवास योजनेचा लाभ (PMAY) पूर्वी फक्त गरीब वर्गासाठी होता. पण, आता गृहकर्जाची रक्कम वाढवून त्याचा लाभ मध्यमवर्गालाही दिला जात आहे. यापूर्वी, PMAY मधील गृह कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपयांपर्यंत होती, ज्यावर व्याज अनुदान दिले जात होते. पण आता ती वाढवून 8 लाख रुपये करण्यात आली आहे.

EWS साठी वार्षिक घरगुती उत्पन्न 3 लाख रुपये निश्चित केले आहे. एलआयजीचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख दरम्यान असावे. त्याचबरोबर, आता 12 आणि 18 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लोक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker