एसबीआयकडून अलर्ट! जर तुम्हाला बँक खाते हॅक होण्यापासून वाचवायचे असेल तर ‘असे’ बनवा पासवर्ड, ‘ह्या’ 8 मार्गांचे अनुसरण करा

MHLive24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- सध्याच्या दिवसांमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या तसेच बँकांच्या अडचणी वाढत आहेत. हे पाहता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा पासवर्ड मजबूत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना पासवर्ड कसा स्ट्रॉंग ठेवायचा ते सांगितले आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्ही बँकेच्या या 8 पद्धती वापरून पाहू शकता.

एसबीआयने एका ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पासवर्ड स्ट्रॉंग बनवण्याचे 8 मार्ग सांगण्यात आले आहेत. पहिला मार्ग- पासवर्डमध्ये अपरकेस आणि लोअरकेस दोन्हीचे संयोजन असावे. जसे – aBjsE7uG.

स्ट्रॉन्ग पासवर्ड तयार करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्यात संख्या आणि चिन्हे समाविष्ट करणे. एसबीआयच्या मते, पासवर्डमध्ये संख्या आणि चिन्हे दोन्ही वापरा. उदाहरणार्थ – AbjsE7uG61!@

Advertisement

एसबीआयने सांगितले की तुमच्या पासवर्डमध्ये किमान 8 अक्षरे असावीत. त्यात सर्व कॉम्बिनेशन असणे आवश्यक आहे. उदा – aBjsE7uG

स्ट्रॉन्ग पासवर्ड तयार करण्यासाठी कॉमन डिक्शनरी शब्द वापरू नका. उदा- itislocked आणि thisismypassword

लक्षात ठेवण्यासाठी कीबोर्ड पाथ ‘qwerty’ किंवा ‘asdfg’ वापरू नका . त्याऐवजी “:) ”,”:/’वापरा.

Advertisement

एसबीआयच्या मते, खूप सामान्य पासवर्ड तयार करू नका. उदा – 12345678 किंवा abcdefg

स्ट्रॉन्ग पासवर्ड असा असावा की त्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. अंदाज लावण्यास सोपे पर्याय वापरू नका. उदा – DOORBELL -DOOR8377

तुमचा पासवर्ड लांबलचक ठेवा आणि ते तुमच्या नावाशी आणि जन्मतारखेशी जोडू नका. जसे – रमेश@1967. बँक म्हणाते की, तुमचा पासवर्ड तुमची सिग्नेचर आहे. ते यूनिक आणि स्ट्रॉन्ग ठेवा.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker