Investment Tips : आजकाल अनेक आईवडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप सतर्क झाले आहेत.मग यात शिक्षण असो किंवा इतर काही भविष्याच्या संबंधीत गोष्टी.

या सतर्कतेमुळे आजघडीला अनेक आईवडील आपल्या मुलांच्या नावे काही बचत करत आहेत. ह्या घडामोडी लक्षात घेता अनेक नवनवीन योजना मार्केटमध्ये येत आहेत.

आज आपण अशाच योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. अशातच जर तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित असेल तसेच करबचती असेल तर यापेक्षा चांगले काय असेल.

यासाठी सोपा मार्ग म्हणजे मुलाच्या नावावर गुंतवणूक करणे. यामुळे मुले मोठी होईपर्यंत चांगला फंड तयार होईल, जो त्यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल, आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगत आहोत, जै उपयुक्त ठरतील.

तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि मुलांच्या नावे म्युच्युअल फंडाच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी आहे.

या सर्व दीर्घकालीन गुंतवणूक आहेत. • याचा फायदा असा होतो की, छोट्या गुंतवणुकीतून मोठा फंड तयार होऊ शकतो. लाभाश किंवा भाडवली नफा यासारख्या उपरोक्त साधनातील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जाते.

मग, पालकांच्या कर स्लैबनुसार यांवर कर आकारला जातो. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने PPF मध्ये खाते उघडू शकता. आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. पीपीएफमध्ये मिळणारे व्याजही करमुक्त असते.

आर्थिक नियोजन:-  विशिष्ट म्युच्युअल फंड, ASY, ULIP किंवा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीही मुलाच्या नावाने घेता येतात. या गुंतवणुकीमध्ये कलम 80C अंतर्गत वजावट मिळेल. जर तुम्ही मुलाच्या नावाने मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर त्याला कलम BOD अंतर्गत कपातीचा दावा करण्याचीही परवानगी असेल.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी आहे. तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. यावर तुम्हाला करात सूट मिळेल.

SSY मधील व्याज आणि परिपक्वता रकमेला देखील करातून सूट दिली जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना 2019 च्या परिच्छेद 3 नुसार, पालक मुलाच्या नावाने PPF खाते उघडू शकतात.

या योजनेच्या परिच्छेद 4 मध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या नावाने PPF खाते तसेच मुलाच्या नावाने PPF खाते उघडले तर दोन्ही खात्यामधील ठेवी एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसतील करू शकतो.