Health Tips : तुम्हाला हे माहिती असेलच कि आरोग्यासाठी आवळा हा किती महत्वाचा मनाला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे देखील होतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या घरात आवळ्यापासून मुरब्बा, लोणचे आणि ज्यूस बनवता येतो. मात्र तुम्ही कधी आवळ्यापासून बनवलेल्या चटणीचा आस्वाद घेतला आहे का? जर तुम्हाला आत्तापर्यंत आवळ्यापासून बनवलेल्या चटणीची चव चाखता आली नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी या चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत.
सरकारी योजना, गुंतवणूक, लाईफस्टाईल टिप्स आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा मोफत इथे क्लिक करून
आवळा चटणी चवीने भरपूर असते याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वेही आढळतात. आपली दृष्टी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. इतकेच नाही तर ते आपल्या पोटासाठीही खूप फायदेशीर ठरते. तर आज या लेखाद्वारे आपण आवळा चटणी बनवण्याची संपूर्ण पद्धत जाणून घेणार आहोत.
आवळा चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
8-10 आवळा
1/2 इंच आल्याचा तुकडा
4 चमचे चिरलेली कोथिंबीर
4-5 पाकळ्या लसूण
2-3 हिरव्या मिरच्या
1 टीस्पून मोहरीचे तेल
चवीनुसार मीठ
आवळा चटणी कशी बनवायची
आवळा चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करावा लागेल. आवळा पाण्याने स्वच्छ केल्यानंतर बारीक चिरून घ्या. आवळा चिरल्यानंतर कोथिंबीरही बारीक चिरून घ्यावी. नंतर दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.
यानंतर आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि तेल मिक्सरमध्ये टाका. आता त्यात पाणी घालून पुन्हा 1 ते 2 मिनिटे बारीक करा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची आवळा चटणी तयार होईल. आवळा चटणी फ्रिजमध्ये ठेवून आठवडाभर वापरता येते.
हे पण वाचा : Minimum Balance Rules: ‘या’ बँकांमध्ये खाते असेल तर ‘इतके’ पैसे खात्यात ठेवा नाहीतर भरावा लागेल दंड