Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :-गुगलचा वापर सर्वजण सर्च करण्यासाठी करतात. ज्याची माहिती कुठेच मिळणार नाही ती माहिती गुगलवर नक्की मिळेल असा नेटीझन्सला विश्वास आहे.

पण तुम्ही सर्च करताना थोडा विचार करता का? की आपण गुगलवर नेमकं काय सर्च करतोय. कारण गुगलवर चुकूनही खालील गोष्टी अजिबात सर्च करू नका. या गोष्टी अशा आहेत ज्यांना सर्च केल्याने आपण मोठ्या अडचणीत येऊ शकता. परिणामी आपल्याला जेलमध्ये देखील जावे लागू शकते.

गुगलवर कधीही बॉम्ब बनविण्याची पद्धत शोधू नका. जर आपण असे केले असेल तर आपल्याला तुरूंगात जावे लागू शकते. आपण गुगलवर बॉम्ब बनवण्याच्या पद्धतीचा शोध घेताच, कंपनी आपला अॅलड्रेस सुरक्षा एजन्सींना पाठवेल. यानंतर लगेचच सुरक्षा यंत्रणा सतर्क होतील.

सुरक्षा एजन्सी आपल्याविरूद्ध त्वरित कारवाई करू शकतात आणि आपल्याला जेलमध्ये जावे लागू शकते. गुगलवर कधीच स्वतःची ओळख सर्च करू नका. कारण गुगलजवळ तुमच्या सर्ट हिस्ट्रीचा सर्व डेटाबेस असतो. सतत ओळख सर्च केल्यामुळे ती माहिती लीक होण्याची शक्यता असते.

कारण हॅकर्स याचीच वाट बघत असतात की, आपल्याला कोणती गोष्ट अगदी सहज मिळेल. खासगी ई-मेल लॉगिनला गुगलवर सर्च करू नका. असं केल्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक किंवा पासवर्ड लीक होऊ शकतो.

अभ्यासावरून अशी माहिती समोर आली आहे की, जगभरात ई-मेल हॅक करण्याची घटना सर्वाधिक घडतात. सायबर सेलकडे याच्या अनेक तक्रारी आहेत. गुगलवर कधीही औषधे सर्च करू नका. जर आपली तब्येत खराब असेल आणि आपण गुगलवर औषधे सर्च करून

ती खाल्ल्यास आपण आजारी देखील पडू शकता. कधीकधी चुकीची औषधे घेतल्यास आपले आरोग्य अधिक प्रमाणात बिघडू शकते. गुगलवर कधीही असुरक्षाशी संबंधीत असलेल्या गोष्टी सर्च करू नये. जर तुम्ही असं कराल तर त्याच्या जाहिराती तुम्हाला सतत येत राहतील.

त्यावरून तुम्हाला हे कळेल की, कुणी तरी तुम्हाला इंटरनेटवर फॉलो करत आहे. जर तुम्हाला वाटतं की, तुम्हाला कोणतीही जाहिरात दिसू नये तर याची खबरदारी घ्या.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology