Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

काय सांगता ! मास्कमध्येच मिळेल कॉलिंग व मजूझिकचा आनंद , टॅप करताच वाढेल मोबाईल स्क्रीन ; वाचा…

Mhlive24 टीम, 12 जानेवारी 2021:सीईएस 2021 च्या पहिल्याच दिवशी बरेच प्रोडक्ट प्रसिद्धीस आले. एआय आधारित घरगुती उपकरणे आणि रोबोट्स यांच्यासह अनेक जीवन सोपे, सहज बनविणारे प्रोडक्ट शोमध्ये सादर केले.अशाच काही इनोवेशनबद्दल जाणून घेऊया…

Advertisement

1. बीनाटोन मास्कफोन: किंमत 3,700 रुपयांच्या आसपास

हाँगकाँगची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बिनाटोनचा फेस मास्क नियमित मास्कसारखा दिसत आहे, परंतु कामाच्या दृष्टीने तो बर्‍यापैकी प्रगत आहे. मास्क मध्ये N95 फिल्टर आहेत, जे प्रदूषण रोखतात. यात मायक्रोफोन आणि इअरबड्स देखील आहेत, ज्यामुळे कॉल अटेंड केला जाऊ शकतो.

Advertisement

यात 13 तासांची बॅटरी लाइफ मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. त्याची अपेक्षित किंमत 3,700 रुपयांपर्यंत असेल. हे विशिष्ट प्रकारच्या अ‍ॅप्सशी कनेक्ट केले जाऊ शकते, जेणेकरून मस्कवरूनच अलेक्सा आणि Google असिस्टेंट एक्सेस केले जाईल.

Advertisement

2. TCL चा रोलेबल फोन: टॅप करताच वाढेल स्क्रीन साइज

टीव्हीसाठी लोकप्रिय टीसीएल आता स्मार्टफोन विभागातही प्रवेश करत आहे. शोमध्ये कंपनीने रोलेबल फोनच्या दोन संकल्पना सादर केल्या आहेत. यात 6.7 इंचाचा डिस्प्ले फोन असून फोनची स्क्रीन एकाच टॅपमध्ये 7.8 इंचमध्ये रुपांतरित होईल.

Advertisement

याशिवाय कंपनीने 17 इंचाचा ओईएलईडी स्क्रोलिंग डिस्प्ले असणारा फोनदेखील सादर केला. सध्या कंपनीने या लॉन्चिंगविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. रोलेबल कॉन्सेप्ट व्यतिरिक्त कंपनीने 5 आगामी मॉडेल्सदेखील सादर केले आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li