Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

सिल्क साडीची चमक कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारे धुवा

Mhlive24 टीम, 13 डिसेंबर 2020 :पारंपारिक लुकसाठी महिलांना सिल्कची साडी घालायला आवडते. बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य स्त्रिया सिल्कच्या साड्या घालतात.सिल्कच्या साड्यांना वेगळी चमक असते. सिल्कच्या साड्या खूप महाग असतात. ज्यामुळे साडीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

Advertisement

जर सिल्कच्या साडीची योग्य काळजी घेतली नाही तर साडीची चमक कमी होते. महिला घरी सिल्कच्या साड्या धुवतच नाहीत तर ह्या साड्या त्या बाहेर ड्राय क्लिनिंग साठी देतात. परंतु प्रत्येक वेळी ड्राई क्लीनिंगमध्ये साडी देणे महाग असते.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

आपण घरी देखील सिल्कच्या साड्या धुवू करू शकता. जर घरीच सिल्कच्या साड्या व्यवस्थित धुतल्या तर साडीची चमक कमी होत नाही किंवा साडी खराब होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात सिल्कच्या साड्या योग्य प्रकारे कश्या धुवाव्यात.

Advertisement

साडी हातांनी धुवावी

सिल्कच्या साड्या घरीच हातांनी धुतल्या पाहिजेत. सिल्कची साडी धुण्यासाठी प्रथम एक बादलीमध्ये पाणी घ्या. नंतर पाण्यात सिल्क साडी धुण्यासाठी असणारा निरमा टाका. आपल्याकडे तो निरमा नसल्यास आपण बेबी शैम्पू वापरू शकता. यानंतर साडी पाच मिनिटे पाण्यात भिजवा. नंतर त्यात साधे पाणी टाका. या पाण्यात थोडीसे व्हाईट व्हिनेगर टाका.

Advertisement

व्हिनेगर टाकल्याने साडीला लागलेला फेस निघून जातो . यानंतर, पाणी टाकून फॅब्रिक कंडिशनर मिसळा. यानंतर, सिल्कची साडी स्वच्छ आणि कोरड्या कपड्यावर रोल करा. रोल केलेली साडी हलकी अशी फिरवा त्यामुळे साडीतील जास्तीचे पाणी निघून जाईल. यानंतर, दुसऱ्या कोरड्या कपड्यावर साडी ठेवा आणि हवेत सुकू द्या.

Advertisement

सिल्कच्या साडीवरील डाग कसा धुवावा

जर तुमच्या सिल्कच्या साडीला डाग पडला असेल तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. डाग लागल्यानंतर लगेच स्वच्छ करा. डाग कोरडे झाल्यानंतर, त्यांना काढून टाकणे फार कठीण आहे. तसेच आपण व्हाईट व्हिनेगर आणि लिंबाच्या रसाच्या सहाय्याने डाग काढून टाकू शकता.

Advertisement

या गोष्टींची काळजी घ्या

सिल्कची साडी धुण्यापूर्वी तिचा रंग तर जात नाही ना ह्याची खात्री करुन घ्या. सिल्कची साडी साफ करण्यासाठी वापरले जाणारे डिटर्जंट मऊ असले पाहिजेत. कारण खडबडीत डिटर्जंट आणि ब्लीच तुमची साडी खराब करू शकते.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li