Mhlive24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती.
नव्या कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिला आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सन २०१८ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे १०.९५ टक्क्यांनी वाढले. अलीकडे राज्यात एकतर्फी प्रेमातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या क्रूर घटना घडल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आंध्रच्या धर्तीवर नवा कायदा आणण्याचे वचन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. शक्ती विधेयकावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली.
शक्ती विधेयकाचा प्रस्ताव आता राज्याच्या अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर