Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

मोठी बातमी : आता प्रत्येक रेल्वे स्थानकात ‘असा’च मिळणार चहा; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

Mhlive24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- आता प्रत्येक रेल्वे स्थानकात केवळ मातीच्याच भांड्यात चहा मिळणार आहे. कारण प्लास्टिकचे कप आता स्थानकात दिसणार नाहीत. ही घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

Advertisement

माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यांनी 15 वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मातीच्याच भांड्यात चहाची सुरवात केली होती. पण प्लास्टिक आणि कागदाच्या कपांनी अतिक्रमण केले.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

गोयल म्हणाले की, आता भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकात चहा प्लास्टिक कपऐवजी इको फ्रेंडली कपांमध्ये विकला जाईल. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ढीगवाड़ा रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते.

Advertisement

उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत नव्याने विद्युतीकरण झालेली ढीगवाड़ा-बांदीकुई सेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

लाखो लोकांना रोजगार मिळू शकेल

रेल्वेमंत्री म्हणाले की सध्या देशातील सुमारे 400 रेल्वे स्थानकांवर अशा पद्धतीने चहा देण्यात येत आहे. भविष्यात देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर केवळ मातीच्याच भांड्यात चहा विक्री करण्याची आमची योजना आहे.

Advertisement

हा उपक्रम प्लास्टिक फ्री इंडियाच्या दिशेने रेल्वेचे योगदान आहे. या उपक्रमातून पर्यावरणाचेही संरक्षण होईल आणि लाखो लोकांना त्यातून रोजगार मिळू शकेल.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li