Take a fresh look at your lifestyle.

Paytm नं पेमेंट करणं महागलं…अतिरिक्त पैसे देण्यासाठी तयार राहा

0

Mhlive24 टीम, 16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्याआ काळात रोखी पेक्षा ऑनलाईन बरं असं म्हणत बहुतांश ठिकाणी ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर वाढले होते. वीज बील भरण्यापासून ते गॅस सिलेंडर बूक करण्यापर्यंत आणि मोबाईल-डीटीएच रिचार्ज करण्यापासून ते ऑनलाईन खरेदीपर्यंत पेटीएम व्हॉलेटचा (Paytm Wallet) सर्रास वापर करताना दिसतात.

Advertisement

मात्र, युझरसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पेटीएमचा वापर करणे 15 ऑक्टोबरपासून महागले आहे.आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे अॅड करण्यासाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज नव्हता. परंतु आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

Advertisement

15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डमधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे.

Advertisement

उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.

Advertisement

यामध्ये कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही

र्चेंट साईटवर पेटीएममधून पेमेंट केल्यानंतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. पेटीएम टू पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. तसंच डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ऍड केल्यासही कोणताही चार्ज भरावा लागणार नाही.

Advertisement

दरम्यान पेटीएम टू पेटीएम वॉलेटमध्ये ट्रान्सफर केल्यास कोणताही चार्ज लागणार नाही. शिवाय क्रेडिट कार्डमार्फत पेटीएममध्ये मनी लोड करण्यासाठी कंपनी सध्या एक टक्का कॅशबॅकही देते आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li