Take a fresh look at your lifestyle.

अन्न व कृषी संघटनेचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जारी केले 75 रुपयांचं नाणं

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-  नुकतीच 100 रुपयांचे नाणे जारी करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक नवे नाणे जारी करण्यात आले आहे. अन्न व कृषी संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 75 रुपयांचे स्मृती नाणे जारी केले.

Advertisement

असे असणार 75 रुपयांचे नाणे

अधिसूचनेनुसार, 75 रुपयांच्या या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे आण 5 टक्के झिंक आणि 5 टक्के जस्त धातूपासून हे नाणं बनवलं जाणार आहे.

Advertisement

यावेळी पंतप्रधान मोदींनी नुकत्याच विकसित केलेल्या 8 पिकांच्या 17 जैव संवर्धित बियाणांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी असे म्हटले की, देश आणि जगभरातून कुपोषण नष्ट करणे हे आमचे ध्येय आहे.

Advertisement

पंतप्रधानांनी नवीन कृषी कायद्याबाबत भाष्य करताना असे म्हटले की, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एमएसपी (MSP) जारी राहिल.

Advertisement

अन्न व कृषी संघटनेचा 75 वा वर्धापन दिन विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे. या 75 वर्षांमध्ये FAO ने भारतासहित संपूर्ण जगभरात कृषी उत्पादन वाढवले, गरिबी हटवण्यात FAO ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचंही ते म्हणाले.

Advertisement

भारत सरकारकडून जारी करण्यात आलेले 75 रुपयांचे स्मृती नाणे एफएओच्या देशाच्या 130 कोटी जनतेकडून करण्यात आलेला सन्मान असल्याचंही मोदी म्हणाले.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li