Mhlive24 टीम, 29 डिसेंबर 2020 :–खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे नाव बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. अक्षय कुमारच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे कारण अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, 108 कोटी रूपयांवरून 135 कोटी रूपये एवढी अक्षयने मानधनात वाढ केल्याचे म्हटले आहे. अक्षयने यापूर्वी 99 कोटींवरून 108 कोटी एवढी वाढ केली होती.
अमेरिकन बिझिनेस मॅगझिन फोर्ब्सने नुकतीच 2020 मध्ये जगातील 100 सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय असून 52 व्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या कमाईवर कोरोनाचाही परिणाम झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे उत्पन्न 88 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. असे असूनही, तो जॅकी चॅन आणि जेनिफर लोपेझ सारख्या कलाकारांपेक्षा पुढे आहे. 2019 मध्ये त्यांची कमाई ( 444 कोटी रुपये) होती, जी यंदा कमी होऊन 48.5 मिलियन डॉलर (अंदाजे 356 कोटी रुपये) झाली आहे.
मागील वर्षी अक्षय या यादीमध्ये 51 व्या स्थानावर होता आणि 2018 मध्ये 270 कोटींची कमाई करुन 76 व्या स्थानावर होता. सध्या अक्षयकडे पृथ्वीराज, राम सेतु, मिशन लायन, रक्षाबंधन हे आगामी चित्रपट आहेत.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर