Take a fresh look at your lifestyle.

तुमची विमा पॉलिसी मॅच्युअर झालीये? लवकर काढून घ्या रक्कम, अन्यथा…

0 2

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- जर आपण विमा पॉलिसी घेतली असेल आणि ती मॅच्युअर झाली असेल तर लवकर त्याची रक्कम काढून घ्या. मॅच्युअर झाल्यानंतर आपण 10 वर्षांपर्यंत पॉलिसीवर दावा केला नसेल तर तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही. आपली विमा कंपनी ती रक्कम सरकारी खात्यात जमा करेल. ही रक्कम इतर कोणत्याही कामात वापरले जाईल.

Advertisement

आयआरडीएआयचे निर्देश

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार, जर पॉलिसीधारक मॅच्युअर झाल्यानंतर 10 वर्ष विमा पॉलिसीचा दावा करत नसेल तर त्याला पॉलिसीची मॅच्युरिटी रक्कम मिळणार नाही. पॉलिसी मॅच्युरिटीच्या 10 वर्षानंतर संबंधित विमा कंपनी त्या पॉलिसीची सर्व रक्कम सरकारी तिजोरीत जमा करेल.

Advertisement

आयआरडीएआयने आपल्या नवीन परिपत्रकात असे म्हटले आहे की पॉलिसीधारक नियोजित तारखेच्या 10 वर्षांच्या आत दावा करु शकतात. जर 10 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असेल तर पॉलिसीधारकाचा यावर कोणताही हक्क नाही.

Advertisement

ही रक्कम सीनियर सिटीजन वेलफेयर फंडमध्ये जमा केली जाईल

विमा नियामकाने आदेश दिले आहेत की, सर्व विमा कंपन्यांनी पॉलिसी मॅच्युरिटीनंतर 10 वर्षानंतर दावा न केलेले खाते व त्यातील रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण फंडात जमा करणे आवश्यक आहे. भारतीय जीवन विमा महामंडळासह हा नियम सर्व विमा कंपन्यांना लागू असेल.

Advertisement

नियामकाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे की सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर हक्क न सांगितलेल्या रकमेची माहिती द्यावी लागेल. ते दर 6 महिन्यांनी अपडेट केले जावे.

Advertisement

‘इतकी’ आहे हक्क न सांगितलेली (अनक्लेम्ड) रक्कम

अंदाजित आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत, विमा कंपन्यांकडे 17877.28 कोटी रुपये अनक्लेम्ड रक्कम म्हणून पडून होते. यापैकी जीवन विमा कंपन्यांकडे 16887.66 कोटी रुपये आणि सामान्य विमा कंपन्यांकडे 989.62 कोटी रुपये होते.

Advertisement

आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना वेबसाइटवर क्लेम रकमेची सर्च सुविधा देण्यास सांगितले आहे. त्याच्या मदतीने, पॉलिसीधारकांना कळू शकेल की या कंपन्यांकडे त्यांच्या नावाची काही रक्कम शिल्लक आहे की नाही. यानंतर तो आपल्या पॉलिसीच्या रकमेवर दावा करु शकतो.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li