Breaking News Updates of Maharashtra , Latest Politics,Crime, Entertainment, Sports,Money And Lifestyle News 

जास्त गोरे होण्यासाठी फॉलो करा ह्या 5 सर्वोत्तम टिप्स

Mhlive24 टीम, 14 डिसेंबर 2020 :हे पाच उपाय आपल्याला घरीच त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेला निखारण्यासाठी खूप मदत करतील!

Advertisement

बाजारात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकारची प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक प्रॉडक्ट आपल्याला हवा तास रिजल्ट देत नाही. आपण घरगुती उपचारांचा वापर दररोज त्वचेची काळजी घेण्यासाठी केल्यास त्यामधूनही चांगले परिणाम मिळू शकतात.

Advertisement
class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

मेकअप करून आपण जास्त सुंदर दिसू शकतो , परंतु यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. इतकेच नव्हे तर बहुतेक स्त्रिया मेकअप काढून टाकण्यासाठी केमिकलपासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर करतात, अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे अधिक महत्वाचे बनते.

Advertisement

यातही घरगुती उपचार आपल्याला खूप मदत करू शकतात. जर तुम्हाला अधिक गोरे व्हायचे असेल तर तुमच्यासाठी घरगुती उपचार हा एक उत्तम पर्याय आहे. इतकेच नाही तर घरगुती उपचारातून लवकर त्वचा उजळते.

Advertisement

घरात असे बरेच उपाय असतात जे त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. घरगुती उपायांच्या मदतीने त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते , तसेच त्वचेला चांगले पोषण देखील दिले जाऊ शकते. चला तर मग त्वचेच्या काळजीशी संबंधित काही घरगुती उपचारांबद्दल जाणून घेऊयात जे आपल्याला हवा तसा रिजल्ट देतील.

Advertisement

या घरगुती उपचारांनी काही क्षणात मिळवा चमकणारी त्वचा !

1. केशर आणि मिल्क फेस मास्क

थोडासे केशर आणि २ चमचे दूध एकत्र करून हि पेस्ट चेहऱ्यावर ३० मिनिटे लावा. यावेळी, जेव्हा चेहऱ्यावरील ही पेस्ट सुकेल तेव्हा पुन्हा चेहऱ्यावर परत ही पेस्ट लावा. आता थंड पाण्याने चेहरा धुवा. या पेस्टमध्ये असणारा केशर त्वचेची चमक वाढवेल, तर दुधात असलेले लैक्टिक ऍसिड त्वचेच्या मृत पेशी दुरुस्त करण्यात मदत करेल.

Advertisement

2. चंदन व गुलाब फेस मास्क

हे फेस मास्क तयार करण्यासाठी, दररोज ४ ते ५ चमचे गुलाबाचे पाणी दोन चमचे चंदन पावडरमध्ये मिसळा. आता ते आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा आणि सुमारे एक तासासाठी ते तेच ठेवा . यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. गुलाबाचे पाणी त्वचेच्या पीएच पातळीचा समतोल राखेल, तर चंदन त्वचेवरील निस्तेजपणा दूर करेल.

Advertisement

3. पपई आणि मधाचे फेस मास्क

पपईचे काही तुकड्यांची चांगली पेस्ट करून घ्या आणि त्यात २ चमचे मध टाका. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर चांगली लावा आणि २ तास तशीच राहू द्या. चेहऱ्यावरील पेस्ट धुण्यासाठी आता गरम पाण्याचा वापर करा. मध त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते, तर पपईचे गुणधर्म त्वचेला नैसर्गिक चमक देतात .

Advertisement

4. बदाम पावडर आणि दूध मलईचे फेस मास्क

सुमारे ४-५ बदाम बारीक करून पावडर बनवा आणि २ ते ३ चमचे दूध मलईत मिक्स करून घ्या. आता ती पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि दोन तास तसेच राहू द्या. नंतर हे मास्क कोमट पाण्याने धुवून काढा. व्हिटॅमिन ईने भरलेला हा मास्क आपल्या त्वचेला पोषण देतो आणि तिला हायड्रेटेड देखील ठेवेल.

Advertisement

5. टोमॅटो आणि बेसनपीठाचे फेस मास्क

अर्धा टोमॅटो चांगला मॅश करून त्यात २ ते ३ चमचे बेसन पीठ टाका. हे चांगले मिसळल्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा आणि २ ते ३ तास तशीच राहू द्या . नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण हा फेस मास्क तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास खूप प्रभावी ठरेल.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li