Take a fresh look at your lifestyle.

धमाका ! एक रुपयात घ्या स्मार्टफोन; ‘ह्या’ कंपनीची ऑफर

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-  आता भारतात फेस्टिव्ह सीजन सुरु होणार आहे. यामध्ये अनेक कंपन्या आपली प्रोडक्ट सेल करण्यासाठी सुसज्ज आहे. त्यासाठी त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धमाकेदार सेल लावले आहे. असाच एक सेल १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टरपर्यंत शाओमी कंपनीने आणला असून Diwali with Mi सेल असे या सेलचे नाव आहे.

Advertisement

यात दररोज दुपारी ४ वाजता फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं असून या सेलमध्ये फक्त एक रुपयांत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फ्लॅश सेल शाओमी कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर असेल.

Advertisement

शाओमी कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार एक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा बँकेच्या क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. शाओमीचं अधिकृत संकेतस्थळ Mi.com वर Diwali with Mi हा सेल आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

या सेलमध्ये अनेक उपकरणांवर ८० टक्के सवलत मिळेल. यात Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅक यांसारख्या प्रोडक्ट्सचाही समावेश आहे. सेल दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत PICK N’ CHOOSE डील्स आयोजित केली आहे. या सेलमध्ये नुकताच रिलिज झालेला ५४,९९९ रुपयांचा Mi 10 हा स्मार्टफोन ४४,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Advertisement

तसेच Redmi Note 9 Pro Max , Redmi Note 8 , Redmi 9 Prime , Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच Redmi 8A dual वर २०० रुपयांची सूट मिळणार आहे. स्मार्टफोन्सशिवाय इतर स्मार्ट प्रॉडक्ट्सवरही भरमसाठ सूट देण्यात आली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li