Take a fresh look at your lifestyle.

खातेदारांनो जरा लक्ष द्या…सरकार या बँकेतील भागीदारी विकणार

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या काळात अनेक बँकांची आर्थिक उलाढाल थंडावली होती. यामुळे अनेक बँकांचा आर्थिक डोलारा डळमळाला होता. त्यातच आता एक मोठी माहिती समोर येत आहे. सरकार आपल्या एका बँकेची सर्व भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

IDBI बँक एक सरकारी बँक होती 1964 मध्ये तिची स्थापना झाली होती. दरम्यान आता आयडीबीआय बँकेतील सर्व भागीदारी सरकार विकणार आहे. लवकरच याकरता कॅबिनेटकडून मंजूरी घेण्यात येईल.

Advertisement

गेल्यावर्षी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सप्टेंबरमध्ये एलआयसी आणि सरकारने इक्विटी रकमेच्या स्वरूपात 9300 कोटींची गुंतवणूक केली होती.

Advertisement

LIC चे आयडीबीआय बँकेत 51 टक्के भागीदारी आहे तर सरकारची  47 टक्के भागीदारी आहे. LIC हि भागीदारी विकण्यास इच्छूक आहे. IDBI बँकेतील हिस्सेदारी सरकारने विकल्यावर बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. बँकेच्या सर्व सेवा सुरळीत राहतील.

Advertisement

मार्च 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 सरकारी बँकांचे विलिनीकरण करून 4 सरकारी बँका बनवण्याच्या प्रस्तावास मंजूरी दिली होती. याअंतर्गत पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचे विलिनीकरण झाले आहे.

Advertisement

कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण झाले आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकचे विलिनिकरण तर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे विलिनीकरण झाले.

Advertisement
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर
Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li