Take a fresh look at your lifestyle.

अबब! सीबीडीटीचा ‘ह्या’ पशुखाद्य उत्पादकांवर छापा; ‘जे’ घबाड सापडले ते पाहून सगळेच आवाक

0 5

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- प्राप्तिकर विभागाने उत्तर भारतातील प्रसिद्ध पशुखाद्य उत्पादकांच्या अनेक ठिकाणी छापे टाकून 52 लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) काल उशिराने ही माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की, 18 नोव्हेंबर रोजी कानपूर, गोरखपूर, नोएडा, दिल्ली आणि लुधियाना या ठिकाणी 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Advertisement

यामध्ये 121 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले. यात अनेक धक्कदायक गोष्टी उजेडात आल्या. या व्यावसायिकांनी अनेक कोटींचे फ्रॉड कर्जही घेतले आहे. तसेच ज्या व्यवसायांवर कर्ज घेतले आहे ते व्यवसाय केवळ कागदावरच असून अस्तित्वात काहीच नाही.

Advertisement

सीबीडीटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आतापर्यंत 52 लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उरलेल्या दागिन्यांच्या स्त्रोतांची पडताळणी केली जात आहे. ”सीबीडीटीने सांगितले की, सात लॉकरही असल्याचे आढळून आले आहे त्यांचा शोध अद्याप लागला नाही.

Advertisement

तसेच 1.30 कोटींची रोकडही सापडली असून त्याची पडताळणी केली जात आहे. या ग्रुपला दिल्लीतील काही कंपन्यांकडून असुरक्षित कर्ज म्हणून 100 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, त्यात संलग्न असलेल्या चिट फंड कंपनीला अज्ञात स्त्रोतांकडून कोट्यवधी रुपयांचे असुरक्षित कर्ज मिळाले होते.

Advertisement

मुखवटा कंपन्यांकडून  (Shell companies) कर्ज

सीबीडीटीने सांगितले की छाप्यादरम्यान असे दिसून आले की या मुखवटा कंपन्यांकडून (Shell companies) या ग्रुपने कर्ज घेतले आहे, तो ग्रुप फक्त कागदावर आहे आणि त्यांचा कोणताही खरा व्यवसाय नाही. कंपनीच्या एका डायरेक्टरचा टॅक्सी ड्रॉयव्हरचे 11 बँक खाती आहेत. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेरी केली आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li