Tata Group : भारतात टाटा ग्रुप सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या ग्रूप पैकी एक आहे. भारतीय लोक टाटा ग्रूपवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात.

अशातच टाटा समूह ई-कॉमर्स क्षेत्रातील रिलायन्स, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. याच दरम्यान टाटा ग्रुपचा एक महत्त्वपूर्ण निर्णय चर्चिला जात आहे.

सदर निर्णय हा टाटा ग्रुप नविन व्यवसाय मध्ये पदार्पण करण्याबाबत आहे. आज आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारतातील टेक ते ऑटो उद्योगापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेला टाटा समूह भारतात आणि परदेशात बॅटरी कंपनी सुरू करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी ही माहिती दिली.

ते म्हणाले की टाटा सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहे. ते म्हणाले की, टाटा समूह सर्व व्यवसायांचा कायापालट करत आहे. यामध्ये टाटा मोटर्स आणि त्यांचे ब्रिटीश लक्झरी युनिट जग्वार लँड रोव्हर यांचा समावेश आहे.

जाणून घ्या कंपनीची योजना काय आहे? ;- भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स 2025 पर्यंत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे, तर जग्वार लँड रोव्हरचा लक्झरी जग्वार ब्रँड 2025 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि कार निर्माता 2030 पर्यंत त्याच्या संपूर्ण लाइनअपचे ई-मॉडेल्स लॉन्च करेल.

“हवामान बदलाचा दबाव वाढत आहे. टाटा समूह लवकरच कार्बन न्यूट्रल होण्याचे आपले उद्दिष्ट जाहीर करेल. बॅटरी “ब्लूप्रिंट” अक्षय ऊर्जा, हायड्रोजन, स्टोरेज सोल्यूशन्स आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणे,” ते म्हणाले. असे करून “भविष्यासाठी तयार” राहणे गरजेचे आहे. हा मोठ्या योजनेचा भाग आहे.