Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. चला तर आज आपण अशाच एका चर्चेत राहिलेल्या शेअर बाबत जाणून घेऊया.

वास्तविक या कमी किमतीच्या स्टॉकने जबरदस्त परतावा दिला आहे. हा स्टॉक 36 पैशांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक कैसर कॉर्पोरेशन आहे.

कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 36,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले ते श्रीमंत झाले आहेत.

कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 35 पैसे आहे. कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स 5 मे 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 36 पैशांच्या पातळीवर होते.

29 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 130.55 च्या पातळीवर आहेत. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 36,163 टक्के परतावा दिला आहे.

एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर तो आज श्रीमंत झाला असता.

कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांची किंमत 3.6 कोटी रुपयांच्या जवळपास असेल. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी यावर्षी आतापर्यंत 4,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे .

3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 2.92 रुपयांच्या पातळीवर होते, जे 29 एप्रिल 2022 रोजी 130.55 रुपयांवर पोहोचले आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने वर्षाच्या सुरुवातीला कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 44.70 लाख रुपयांच्या जवळपास गेले असते.

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 वर्षात 23,212 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या 1 महिन्यात कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी लोकांना 175 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.