Share Market
Share Market

MHLive24 टीम, 02 एप्रिल 2022 :- Share Market : शेअर मार्केटमध्ये रोज महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अशातच LIC ने घेतलेला एक निर्णय HDFC AMC च्या शेअर्ससाठी चांगलाच फायद्याचा ठरला.

नुकतेच भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने HDFC मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) मधील आपला हिस्सा वाढवला आहे. या निर्णयानंतर शुक्रवारी एचडीएफसी एएमसी स्टॉकची खरेदी वाढली.

शेअरची किंमत कितीपर्यंत पोहोचली

बीएसई निर्देशांकावरील एचडीएफसी एएमसीच्या शेअरची किंमत 129.10 रुपये किंवा 6.02 टक्क्यांनी वाढून 2275.25 रुपये झाली. 9 सप्टेंबर, 2021 HDFC AMC च्या शेअरची किंमत 3,363 रुपयांवर गेली, जी 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. कंपनीचे बाजार भांडवल 48,525 कोटी रुपये आहे.

LIC ने वाढवली हिस्सेदारी

LIC ने HDFC AMC मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. एलआयसीने आपला हिस्सा पूर्वीच्या 5.505 टक्क्यांवरून 7.026 टक्के केला आहे. शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एलआयसीने आपला हिस्सा 14,984,224 इक्विटी शेअर्सपर्यंत वाढवला आहे. आतापर्यंत होल्डिंग 10,674,583 इक्विटी शेअर्स होते.

गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या नफ्यात 2.58 टक्क्यांनी घट झाली होती. नफा 359.75 कोटी रुपये होता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit