Rakesh JhunJhunwala Portfolio
Rakesh JhunJhunwala Portfolio

Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. यावेळी चौथ्या तिमाहीत, दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओद्वारे बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनी NCC लिमिटेडमध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे.

दलाल स्ट्रीटचा बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला स्वतःच्या आणि पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावावर गुंतवणूक करतात. झुनझुनवाला दाम्पत्य डिसेंबर 2015 पासून NCC चे शेअर्स धारण करत आहेत.

झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2015 मध्ये पत्नी रेखाच्या नावाने पहिल्यांदा एनसीसीमध्ये गुंतवणूक केली. मार्च 2016 पासून त्यांनी या कंपनीतील अधिक भागभांडवल त्यांच्या नावावर खरेदी केले.

आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 पर्यंत, रेखा झुनझुनवाला यांची NCC मध्ये शेअरहोल्डिंग 1.90% होती किंवा त्यांच्याकडे कंपनीचे 1.16 कोटी इक्विटी शेअर्स होते.

दुसरीकडे राकेश झुनझुनवाला यांचा NCC मधील हिस्सा 10.94% किंवा NCC च्या 6,67,33,266 इक्विटी शेअर्सवर अपरिवर्तित आहे. झुनझुनवाला यांनी एनसीसीमधील आपली हिस्सेदारी बदलली नाही.

त्यांनी त्यांची पत्नी रेखाच्या पोर्टफोलिओद्वारे कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 0.72% पर्यंत वाढवली. एक्सचेंजेसवरील NCC च्या नवीनतम शेअरहोल्डिंग डेटावरून असे दिसून आले आहे

की रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीमध्ये 2.62% हिस्सा आहे किंवा मार्च 2022 पर्यंत कंपनीचे 1.6 कोटी इक्विटी शेअर्स आहेत. मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 2022 मध्ये NCC चे शेअर्स आतापर्यंत 3% ने घसरले आहेत.

दरम्यान, बुधवारच्या बंद किंमतीच्या तुलनेत एका वर्षात शेअर्समध्ये 8% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. 13 एप्रिल 2021 रोजी, NCC चे शेअर्स BSE वर 75.8 रुपयांवर व्यवहार करत होते.

बुधवारी, NCC शेअर्स बीएसईवर 0.71% कमी होऊन 69.60 रुपयांवर बंद झाले. सध्याच्या किमतीनुसार NCC चे बाजार मूल्य 4,244.53 कोटी रुपये आहे.

एका वर्षात स्टॉकमध्ये सुधारणा होऊनही राकेश झुनझुनवाला यांनी एनसीसीमध्ये स्टेक विकत घेतला आहे. एनसीसी शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 98.45 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 55.80 रुपये आहे.