Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत मोठा बदल होत आहे.

बाजारातील या दिग्गज गुंतवणूकदाराने या काळात टायटन कंपनीतील आपली हिस्सेदारी काहीशी कमी केली आहे. दुसरीकडे एनसीसीवर पुन्हा विश्वास व्यक्त करत त्यांनी या कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

ट्रेंडलाइनच्या अपडेटनुसार, राकेश झुनझुनवाला यांनीही मार्च तिमाहीत कॅनरा बँकेतील हिस्सा वाढवला, तर एस्कॉर्ट्स लि. आणि वोक्हार्ट लि. मोठ्या प्रमाणावर विक्री करून, भागभांडवल 1 टक्क्यांपेक्षा कमी केले आहे.

टायटन कंपनीचे 40,000 शेअर्स विकले:-  राकेश झुनझुनवाला यांच्या ताज्या पोर्टफोलिओनुसार, त्यांनी टायटन कंपनीमधील हिस्सा 0.04 टक्क्यांनी कमी केला आहे.

आता त्याच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे 44,850,970 शेअर्स शिल्लक आहेत. तर डिसेंबरच्या तिमाहीत त्यांच्याकडे कंपनीचे 45250970 शेअर्स होते. म्हणजेच जानेवारी ते मार्च या तिमाहीत त्यांनी कंपनीचे 40,000 शेअर्स विकले आहेत.

याआधी डिसेंबरच्या तिमाहीत त्यांनी कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 4.9 टक्क्यांवरून 5.1 टक्क्यांपर्यंत वाढवली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत

त्यांचा 4.9 टक्के आणि जून तिमाहीत 4.8 टक्के होता. हा स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या सर्वात विश्वासार्ह स्टॉकपैकी एक आहे आणि तो मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.

एनसीसीवर विश्वास वाढला :- राकेश झुनझुनवाला यांचा एनसीसी या कन्स्ट्रक्शन कंपनीवरचा विश्वास वाढला आहे. मार्च तिमाहीत त्यांनी कंपनीतील आपला हिस्सा 0.7 टक्क्यांनी वाढवून 13.6 टक्क्यांवर नेला.

राकेश झुनझुनवाला आणि कुटुंबाकडे आता कंपनीचे 82733266 शेअर्स आहेत. तर डिसेंबरच्या तिमाहीत त्यांच्याकडे कंपनीचे 78,333,266 शेअर्स होते. म्हणजेच या काळात त्यांनी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 44 लाख नवीन शेअर्स जोडले आहेत.

या शेअर्समध्येही बदल;-  राकेश झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत कॅनरा बँकेतील हिस्सा 0.4 टक्क्यांनी वाढवला आहे. आता बँकेकडे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 35,597,400 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 864 कोटी रुपये आहे.

तर एस्कॉर्ट्स लि. हिस्सा 5.2 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आला आहे. तर वोक्हार्ट लि. हिस्सा 2.3 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्यात आला आहे.