Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. अशातच राकेश झुनझुनवाला यांनी मार्च तिमाहीत सरकारी मालकीच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मधील त्यांची हिस्सेदारी विकली आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस SAIL मध्ये 1.09 टक्के हिस्सा होता. कंपनीच्या अलीकडच्या भागधारकांच्या यादीत त्यांचे नाव नाही.

तथापि, राकेश झुनझुनवाला यांनी SAIL मधील त्यांचे संपूर्ण स्टेक विकले की कमी केले हे स्पष्ट झालेले नाही कारण कंपन्यांना त्यांच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी स्टेक असलेल्या शेअरधारकांची नावे जाहीर करणे बंधनकारक नाही.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस SAIL मध्ये 4,50,00,000 शेअर्स किंवा 1.09 टक्के हिस्सा होता. डिसेंबरच्या तिमाहीत त्यांनी कंपनीतील त्यांची हिस्सेदारी कमी केली होती आणि ती 1.76 टक्क्यांवरून 1.09 टक्क्यांवर आणली होती.

राकेश झुनझुनवाला यांनी स्वत: आणि पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांच्या नावे सेलमध्ये गुंतवणूक केली होती. तथापि, 31 मार्च 2022 पर्यंत जारी केलेल्या अलीकडील शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्यांचे नाव नाही.

बुधवारी NSE वर सेलचे शेअर्स 2.11 टक्क्यांनी घसरून 101.90 रुपयांवर बंद झाले. SAIL शेअर्सनी 2022 च्या सुरुवातीपासून त्यांच्या गुंतवणूकदारांना 7.45 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे 14 टक्क्यांनी घसरली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सेलचे शेअर्स 84.35 रुपयांवर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

तेव्हापासून, स्टॉक सुमारे 24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 8.35 टक्के सकारात्मक परतावा दिला आहे.

सेंट्रम बोकरिंगने ही टार्गेट किंमत दिली आहे :- ब्रोकरेज सेंट्रम बोकरिंगने 200 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह SAIL शेअर्सवर खरेदी कॉल केला आहे. पुढील एका वर्षात सेलचे शेअर्स ही पातळी गाठू शकतात, असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की ते सध्याच्या मूल्यांकनातून चांगला परतावा दर्शवित आहे आणि स्टीलच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे चौथ्या तिमाहीत त्याचा EBITDA 15.4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.