Radhakishnan Damani Portfolio
Radhakishnan Damani Portfolio

Radhakishnan Damani Portfolio :बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. दरम्यान आज आपण झुनझुनवाला यांच्या गुरुंबाबत काही जाणून घेणार आहोत.

मात्र आज आम्ही तुम्हाला राधाकिशन दमानी म्हणजेच आरके दमानी यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत सांगणार आहोत.

अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांचा हैदराबादस्थित सिगारेट कंपनी व्हीएसटी इंडस्ट्रीजवरील विश्वास वाढला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत दमानी यांनी या कंपनीतील आपला हिस्सा वाढवला आहे.

मार्च तिमाहीत, दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजचे सुमारे 12,000 इक्विटी शेअर्स डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिस्टोर्स प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणुकीतून विकत घेतले.

या खरेदीसह, दमाणी यांनी जानेवारी-मार्च तिमाहीत आपला हिस्सा 4.76 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये दमानी यांची हिस्सेदारी 4.68 टक्के होती.

कंपनीच्या शेअरची किंमत काय आहे: VST इंडस्ट्रीजचे मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. ही कंपनी सिगारेटचे उत्पादन आणि वितरण करते. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 3212.35 रुपयांवर होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेअरची किंमत 3,893.95 रुपये होती, जी 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. त्याच वेळी, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात, शेअरचा भाव 2,786 रुपयांवर गेला, जो 52 आठवड्यांचा नीचांक आहे.

या संदर्भात, शेअरच्या किमतीत रिकव्हरी आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 4,960.49 कोटी रुपये आहे. हेही वाचा – कार्डलेस कॅश काढल्याने डेबिट कार्ड बेकार होतील!

हा आरबीआयचा उद्देश आहे दमानी यांची संपत्ती: ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, दमानी यांची संपत्ती 21.4 अब्ज डॉलर आहे. जगातील अब्जाधीशांमध्ये दमानी यांच्या रँकिंगबद्दल बोलायचे तर ते 69 व्या क्रमांकावर आहेत. ते भारतातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक आहेत.