Radhakishnan Damani Portfolio
Radhakishnan Damani Portfolio

Radhakishnan Damani : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात.

त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते. दरम्यान आज आपण झुनझुनवाला यांच्या गुरुंबाबत काही जाणून घेणार आहोत.

मात्र आज आम्ही तुम्हाला राधाकिशन दमानी म्हणजेच आरके दमानी यांच्याबाबत एक महत्वाची माहिती सांगणार आहोत. अब्जाधीश राधाकिशन दमानी यांची रिटेल कंपनी डी-मार्ट चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने प्रचंड नफा कमावला आहे.

मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 3.11 टक्क्यांनी वाढून 426.75 कोटी रुपये होता. वर्षभरापूर्वी जानेवारी ते मार्च या तिमाहीत त्याचा निव्वळ नफा 413.87 कोटी रुपये होता.

त्याच वेळी, ऑपरेशनमधून मिळणारा महसूल मागील आर्थिक वर्षात 7,411.68 कोटी रुपयांवरून 18.55 टक्क्यांनी वाढून 8,786.45 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे, एकूण खर्च 18.71 टक्‍क्‍यांनी वाढून 8,210.13 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या 6,916.24 कोटी रुपये होता.

कंपनीचा निव्वळ नफा 35.74 टक्क्यांनी वाढून पूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1,492.40 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो 2020-21 मध्ये 1,099.43 कोटी रुपये होता.

त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ऑपरेशन्समधील महसूल 28.3 टक्क्यांनी वाढून 30,976.27 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या 24,143.06 कोटी रुपये होता.

एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेव्हिल नोरोन्हा म्हणाले, “त्रैमासिक कामगिरी आणि गेल्या दोन वर्षात मिळालेल्या अनुभवाने आमच्यामध्ये व्यवसायाची लवचिकता आणि अल्पकालीन पुनरुज्जीवनाबद्दल आत्मविश्वास निर्माण केला आहे.