Veranda Learning Solutions : मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. अशातच आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग दिवसांमध्ये 100% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

ही कंपनी आहे- व्हेरांडा लर्निंग सोल्युशन्स, एक कोचिंग कंपनी. हा स्टॉक गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांपासून सतत 10% च्या वरच्या सर्किटला धडकत आहे.

हे शेअर्स त्यांच्या लिस्टिंग दिवसापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढून 277.35 रुपयांवर बंद झाले.

व्हेरांडा लर्निंग सोल्युशन्सचे शेअर्स 15 दिवसांपूर्वी (11 एप्रिल 2022 रोजी) स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले होते. व्हरांडा लर्निंग सोल्युशन्सच्या शेअर्सने बाजारात चांगलीच पदार्पण केले.

कंपनीचे शेअर्स बीएसईवर 157 रुपये प्रति शेअर या दराने इश्यू किमतीच्या जवळपास 14% प्रीमियमसह सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत ₹130-137 इतकी निश्चित करण्यात आली होती.

इश्यू किमतीवरून शेअर्स 102% वाढले व्हरांडा लर्निंग सोल्युशन्सच्या शेअरने 137 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये आतापर्यंत सुमारे 102.45% परतावा दिला आहे. शेअर्सने शुक्रवारी बीएसईवर नवीन विक्रम केला आणि व्यवहारादरम्यान 25 रुपयांनी वाढून 277.35 वर पोहोचला.

गेल्या पाच व्यापार दिवसांत कंपनीच्या शेअर्सनी 40% पर्यंत झेप घेतली आहे. खरेतर, शेअर्स वाढण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन कोचिंग सेवा कंपनीने अलीकडेच TIME चे अधिग्रहण जाहीर केले. हा करार सुमारे ₹ 287 कोटींचा आहे. कंपनी TIME मध्ये 100% स्टेक विकत घेत आहे.

व्हरांडा लर्निंग सोल्यूशन्स काय करते? व्हरांडा लर्निंग सोल्युशन्स ही कलापथी AGS ग्रुपची एड-टेक कंपनी आहे आणि ती भारतातील स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी देते.

यामध्ये राज्य PSC, बँकिंग/कर्मचारी निवड/RRBs, IAS आणि CA शी संबंधित परीक्षांचा समावेश आहे. कंपनी विद्यार्थी, उमेदवार आणि पदवीधर, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना ऑनलाइन-ऑफलाइन शिकवण्याची सुविधा प्रदान करते.