मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात. आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत.

एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी Easy Trip Planners आहे. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना 330 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या कालावधीत कंपनीचे शेअर्स 85 रुपयांवरून 425.55 रुपयांपर्यंत वाढले आहेत. इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सने गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

5 लाख झाले:- इझी ट्रिप प्लॅनर्सचे शेअर्स 20 एप्रिल 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 85.58 रुपयांवर बंद झाले. 7 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 425.55 रुपयांवर पोहोचले आहेत.

या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 330 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक चालू ठेवू दिली असती, तर सध्या हे पैसे 4.97 लाख रुपये झाले असते.

गेल्या 5 दिवसात 22% पेक्षा जास्त परतावा :- गेल्या 5 दिवसात Easy Trip Planners चे शेअर 22% पेक्षा जास्त वाढले आहेत. 1 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 348.50 रुपयांच्या पातळीवर होते. 7 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 425.55 रुपयांवर पोहोचले आहेत.

कंपनीच्या समभागांनी गेल्या एका महिन्यात 55 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचवेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 58.73 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी रोजी 268.10 रुपयांच्या पातळीवर होते, जे आता 425.55 रुपयांवर पोहोचले आहेत.