Multibagger Stock
Multibagger Stock

MHLive24 टीम, 03 एप्रिल 2022 :- Multibagger Stock : मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात. आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत.

डिजिटल मार्केटिंग कंपनी ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स या वर्षी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या यादीत सर्वात वर आहेत. गेल्या एक वर्षात किंवा FY22 मध्ये ते सुमारे ₹4 वरून ₹102 पर्यंत वाढले. या कालावधीत स्टॉक सुमारे 2500 टक्क्यांनी वाढला आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक मागील 5 ट्रेडिंग सत्रांपासून वरच्या सर्किटला पोहचत आहे.

ब्राइटकॉम ग्रुप शेअर किंमतीचा इतिहास

गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे ₹ 65 वरून ₹ 102 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत तो सुमारे 55 टक्क्यांनी वाढली आहे. हा डिजिटल स्टॉक गेल्या 6 महिन्यांत सुमारे ₹38.50 वरून ₹102 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत 165 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक ₹3.94 वरून ₹102.40 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत हा स्टॉक सुमारे 2500 टक्क्यांनी वाढला आहे.

एका वर्षात ₹ 26 लाखाचा फायदा

Brightcom समूहाच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 1.55 लाख झाले असते. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 2.65 लाख झाले असते.

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी ₹1 लाखाची गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर त्याचे ₹1 लाख आज ₹26 लाख झाले असते.

कंपनी काय करते?

ब्राइटकॉम ग्रुप ही डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. ही हैदराबाद स्थित कंपनी आहे, तिची स्थापना 1999 रोजी झाली. कंपनी जगातील अनेक देशांमध्ये एड-टेक, न्यू मीडिया आणि आयओटी आधारित व्यवसायात गुंतलेली आहे. ते अमेरिका, इस्रायल, लॅटिन अमेरिका ME, वेस्टन युरोप आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात व्यवसाय करते.

कंपनीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये Airtel, British Airways, Coca-Cola, Hyundai Motors, ICICI Bank, ITC, LIC, Maruti Suzuki, MTV, P&G Qatar Airways, Samsung, Viacom, Sony, Star India, Vodafone, Titan सारख्या मोठ्या जाहिरातदारांचा समावेश आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit