Take a fresh look at your lifestyle.

कोरोनावरील औषध रेमडेसिविरबद्दल WHO ची धक्कादायक माहिती

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- भारतातील कोरोना रुग्णांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीर या औषधांना वापरलं गेलं. तसेच फेवीपिरवीर औषधही उपचारासाठी वापरले गेले.

Advertisement

रेमडेसिविर हे औषध कोरोना विषाणू संक्रमणाला कमी करू शकतं असा दावा केला जात होता. परंतु आता अमेरिकी फार्मास्युटिकल कंपनीचं हे औषध कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात हे औषध अपयशी ठरलं असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल आहे.

Advertisement

‘सध्या डब्ल्युएचओअंतर्गत 40 कंपन्या लस विकसित करत आहेत. त्यापैकी 10 कंपन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. या वर्षीचा शेवट किंवा 2021 च्या सुरुवातीपर्यंत आपल्याला लस मिळाली असेल,’असा विश्वासही स्वामीनाथन यांनी व्यक्त केला होता.

Advertisement

कसा काढला निष्कर्ष ? :- जागतिक आरोग्य संघटनेनं 30 देशांतील 11 हजार 266 प्रौढ रुग्णांवर रेमडेसिविरच्या क्लिनिकल ट्रायल केल्या होत्या.

Advertisement

यात रेमडेसिविरसोबतच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, अँटिएचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनवीर किंवा रीतोनवीर आणि इंटरफेरॉन तसंच चार संभाव्य ड्रग रेजिमेंट रुग्णांना देण्यात आले होते. याच क्लिनिकल ट्रायलचे निष्कर्ष आता आले आहेत.

Advertisement

गुरुवारी या निष्कर्षांच्या अभ्यासातून डब्ल्युएचओला लक्षात आलं की रेमिडेसिवीर औषध दिल्याने रुग्णालयांत कोविड -19 चे उपचार घेणारे रुग्णांच्या तब्येतीवर किंवा त्यांच्या मृत्युच्या प्रमाणावर 28 दिवसांत कोणताच परिणाम झालेला नाही.

Advertisement

या क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षांचा सखोल अभ्यास अजून करण्यात आलेला नाही. हा प्राथमिक अभ्यास प्रीप्रिंट सर्व्हर medRix वर अपलोड करण्यात आला आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li