Take a fresh look at your lifestyle.

Unlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद ?

0

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-भारतात लॉकडाऊनला जवळपास 6 महिने झाले आहेत. हळूहळू गोष्टी परत रुळावर येत आहेत. अनलॉक अंतर्गत बरेच लॉकडाउन निर्बंध हटविले गेले आहेत. 

Advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं लॉक डाऊन आता हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आता अनलॉक चा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये नवीन नियम जारी केले आहेत. जाणून घेऊयात ही नवीन नियमावली.

Advertisement

१) चित्रपटगृहांना परवानगी अनलॉक ४ अंतर्गत मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा यांसारख्या गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाही.  त्यामुळे आता चित्रपटगृहांना आज सरकार परवानगी देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement

२) पर्यटन कोरोनामुळे देशातील पर्यटन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनलॉक ५ अंतर्गत  पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासंदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड याठिकाणी नियमांचे पालन करत पर्यटनाला मंजुरी दिली आहे.

Advertisement

३) शाळा देशात ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णयाचे अधिकार सरकारने शाळांवर सोपावले आहेत. तर प्राथमिक वर्ग पुढील महिन्यांसाठीही बंद राहण्याची शक्यता आहे आणि ते ऑनलाइन सुरू राहतील.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li