Take a fresh look at your lifestyle.

भारतात दिली जाणार रशियाची Sputnik V लस; वाचा सविस्तर …

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना लशीच्या स्पर्धेत रशिया सर्वात पुढे जाताना दिसत आहे. जिथं सर्व देशांमध्ये अजूनही लशींचं ट्रायल सुरू आहे, तिथं रशियाने आधी आपल्या दोन लशींना मंजुरी दिली आणि आता तिसरी लस तयार केली आहे.

Advertisement

Sputnik V आणि EpiVacCorona नंतर रशियाने आता तिसरी कोरोना लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. आता भारतात रशियाचीही लस दिली जाणार आहे. Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. भारतात या लशीचं ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीजीसीआयकडे अर्ज केला होता. डीजीसीयीआने सुरुवातीला परवानगी दिली नाही.

Advertisement

त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं जाणार आहे. डॉ. रेड्डी लेबोरेटरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि को-चेअरमन जीव्ही प्रसाद यांनी सांगितलं,

Advertisement

“पूर्ण प्रक्रियेत DCGI च्या मार्गदर्शनांचा आम्ही स्वीकार करत आहोत. भारतात आम्हाला ट्रायल सुरू करायला परवानगी मिळाली ही खूप मोठी बाब आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”.

Advertisement

रशियाने स्पुतनिक V लस लाँच करत आपण जगातील सर्वात पहिली लस तयार केल्याचा दावा केला. एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित असलेली ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली आहे. सध्या 13,000 लोकांना ही लस दिली जाते आहे.

Advertisement

या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. मात्र तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लशीला परवानगी दिल्याने या लशीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li