Take a fresh look at your lifestyle.

फेसबुक इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा; हे आहे कारण

0 1

Mhlive24 टीम, 27 ऑक्टोबर 2020 :- भारताच्या फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

दरम्यान, अंखी दास यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत कोणतीच माहिती फेसबुक इंडियाने दिली नाही.

Advertisement

अंखी दास यांच्यावर मागील काही दिवसांमध्ये भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचे गंभीर आरोप झाले आहेत. नुकतीच त्यांची संसदीय समितीनेही चौकशी केली होती.

Advertisement

अंखी दास यांच्यावर हेट कंटेंट ब्लॉक करण्यावरून भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. याबाबत काँग्रेसने अंखी दास यांची फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्याकडे तक्रार केली होती.

Advertisement

यानंतर फेसबुकने अंखी दास यांच्यावरील आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान फेसबुक इंडियाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की,

Advertisement

अंखी दास या भारतातील सुरुवातीच्या फेसबुक कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत आणि भारतात कंपनीच्या वाढीसाठी ९ वर्षांपासून त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे.

Advertisement

फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटले आहे की, “गेल्या दोन वर्षांपासून अंखी दास आपल्या नेतृत्वात काम करत होत्या. त्यांनी खूप योगदान दिले. त्यांच्या सेवेबद्दल आभार मानले आहेत.”

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li