Volkswagen Car Price Hike: वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने (Volkswagen) आपल्या कार्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या किमती 2 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.

ज्यामुळे त्याच्या मॉडेल्सवर कमाल 71,000 रुपये प्रीमियम आकारला गेला आहे. या दरवाढीमध्ये टिगुन (Tigun), व्हर्टस (Vertus) आणि टिगुआन (Tiguan) मॉडेल्स ठेवण्यात आल्या असून नवीन किमती 1 ऑक्टोबरपासून लागू झाले आहे.

Volkswagen Taigun

Volkswagen Taigun बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या किमती 26,000 रुपयांनी वाढल्या आहेत. यावर्षी मे महिन्यात तैगुनच्या किमतीत वाढ करण्यात आली होती, त्यानंतर ती 10.5 लाखांवरून 11.39 लाख रुपये झाली होती.आता पुन्हा एकदा किमती वाढवण्यात आल्या आहेत.

पॉवरट्रेनसाठी, या कारमध्ये 1.0-लीटर 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड आणि 1.5-लीटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. SUV ला स्टँडर्ड म्हणून 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो, तर 1.0-लीटर TSI सह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर उपलब्ध आहे.

Volkswagen Virtus

व्हर्टस सेडान कारच्या किमती व्हेरियंटनुसार रु. 10,000 ते रु. 50,000 पर्यंत वाढल्या आहेत आणि आता किंमती रु. 11.32 लाख ते रु. 18.42 लाख (सर्व किंमती, एक्स-शोरूम) आहेत. Vertus 1.0 TSI इंजिन आणि 1.5 TSI इंजिनसह आणण्यात आले आहे. 1.0 लिटर TSI इंजिन 113 hp पॉवर आणि 178 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, दुसऱ्या इंजिन मॉडेलमध्ये, तुम्हाला 1.5-लीटर TSI मोटर मिळते, जी 148 hp पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन फक्त 7-स्पीड DSG शी जोडलेले आहे.

Volkswagen Tiguan

सर्वात मोठी वाढ फोक्सवॅगन टिगुआनकडून झाली आहे. आता ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 71,000 रुपये जास्त द्यावे लागतील. या वाढीनंतर, Tiguan SUV ची किंमत आता 33.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Tiguan मध्ये तुम्हाला 1,984cc पेट्रोल इंजिन पाहायला मिळते, जे 12.65 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.