Top 7-Seater Cars :  देशातील सर्व कार्स उत्पादकांनी (automakers) सणांची तयारी केली आहे. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ते त्यांच्या डीलचा फायदा घेत आहेत.

या वर्षी अनेक MPV भारतीय बाजारपेठेत (Indian market) लाँच करण्यात आले आहेत. या सणासुदीच्या हंगामात तुम्हाला 6 ते 7 सीटर फॅमिली कार घ्यायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक यादी आणली आहे, जी वाचून तुम्ही स्वतःसाठी चांगली कार निवडू शकता.

Maruti Ertiga

हे सर्वात परवडणाऱ्या MPV पैकी एक आहे. MPV मध्ये 1.5L पेट्रोल तसेच CNG इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनमध्ये ही कार 103 bhp आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लॉन्च केले गेले आहे. त्याची किंमत 8.41 लाख रुपयांपासून सुरू होते. यासोबतच या कारमध्ये फिचर्सचीही मोठी यादी आहे.

Kia Carens

हे या वर्षाच्या सुरुवातीला व्हेरिएंट पर्यायांच्या लांबलचक यादीसह आणि खरेदीदारांना निवडण्यासाठी पॉवरट्रेन पर्यायांसह सादर करण्यात आले होते. कॅरेन्सचे 5 व्हेरियंटमध्ये देशात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यात तीन इंजिन ऑफर आहेत – 115 bhp 1.5L NA पेट्रोल, 140 bhp 1.4L टर्बो पेट्रोल आणि 115 bhp 1.5L डिझेल इंजिन. MPV मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याची किंमत 9.60 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली)

Mahindra Scorpio Classic

महिंद्रा आजपासूनच नव्हे तर अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. हे कंपनीने एकूण दोन व्हेरियंटमध्ये S आणि S11 सादर केले आहे. स्कॉर्पिओ क्लासिक फक्त 7-सीटर केबिनसह आणण्यात आले आहे.

याला 2.2L टर्बो डिझेल इंजिन मिळते. SUV ला अपडेटेड एक्सटीरियर आणि सुधारित केबिन देखील मिळते. त्याची किंमत 11.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते.