Citroen India : Citroen India उद्या नवीन EV सादर करणार आहे. कंपनी 29 सप्टेंबर रोजी Citroen C3 ची झलक दाखवणार आहे. Citroen C3 भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे.

सिक्रेट फोटो

Citron India ने एका क्रिप्टिक सोशल मीडिया साइटवर एक सिक्रेट फोटो शेअर केले आहे, जे पाहिल्यानंतर ते Citroen C3 असल्याचे दिसते. मात्र, कंपनीने अद्याप या वाहनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

नवीन फोटोमध्ये  तुम्ही C3 इलेक्ट्रिक चार्ज होताना पाहू शकता. ही इलेक्ट्रिक कार हुबेहुब Citroen C3 सारखी दिसते, जी सध्या भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. Citroen C3 इलेक्ट्रिकला एकच इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते, जी सुमारे 300 किमीच्या रेंजसह बॅटरी पॅकसह येऊ शकते. हे वाहन ICE व्हर्जनपेक्षा अधिक प्रगत असेल आणि त्यात उपलब्ध फीचर्स देखील आश्चर्यकारक असू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

संभाव्य फीचर्स

Citroen C3 इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये काही EV- व्हेरियंटचे कॉस्मेटिक बदल दिसू शकतात. नियमित मॉडेलप्रमाणेच, इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्रायव्हरसाठी एक-टच डाउन असलेल्या फ्रंट पॉवर विंडो, एसी युनिट, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग यांसारखी फीचर्स मिळतील.

याशिवाय, यात माउंटेड कंट्रोल्स, रिमोट लॉकिंग, टिल्ट अॅडजस्टेबल स्टीयरिंग, डोअर एजर वॉर्निंग, ड्युअल एअरबॅग्ज आणि स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक सारखी सुरक्षा फीचर्स मिळतील.