Safety Norms :  वाहनांच्या सुरक्षेबाबत (safety of vehicles) परिवहन मंत्रालय (Ministry of Transport) पूर्णपणे सतर्क असून एकामागून एक नवीन नियम (new rules) बनवले जात आहेत.

तसेच या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नियम मोडणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागतो. सध्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरक्षेसंदर्भातील दोन समान नियम लागू केले जाऊ शकतात. यामध्ये सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्ज (6 airbags) आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये नवीन बॅटरी नॉर्म्सचा (new battery norms in electric two-wheelers) समावेश आहे. चला तर मग जाणुन घेऊयात भरीव दंड टाळण्यासाठी येणारे हे नियम.

6 एअरबॅग नियम (6 airbags rule)

सुरक्षा वाढविण्यासाठी सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्ज बसवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी गेल्या वर्षी लोकसभेत (Lok Sabha) हा नवा नियम आणण्याची चर्चा केली होती.

यासोबतच वाहन उत्पादकांनाही अशी वाहने तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या आधीच्या विधानानुसार, हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून सर्व नवीन वाहनांसाठी अनिवार्य केला जाऊ शकतो.

आधी जारी केलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, 8 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या आणि 3.5 टन (म्हणजे M1 रेंजमधील वाहने) पेक्षा कमी वजन असलेल्या सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील. त्यामुळे वाहनांच्या किमती 25,000 ते 50,000 रुपयांनी वाढणार आहेत. त्याचबरोबर नियमाकडे दुर्लक्ष केल्यास दंडाची रक्कम किती असेल, याचाही खुलासा सध्या झालेला नाही.

EV बॅटरी सुरक्षा नियम (EV Battery Safety Norms)

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आग लागण्याच्या घटना कमी करण्यासाठी परिवहन मंत्रालय 1 ऑक्टोबरपासून नवीन बॅटरी सुरक्षा नियम लागू करणार आहे. अपडेटेड AIS 156 आणि AIS 038 Rev.2 स्टँडर्ड 1 ऑक्टोबर 2022 पासून इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनिवार्य केली जातील. यासाठी मसुदा अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे.