Post office : आजघडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्ट बँकेकडे पाहिले जाते. पोस्ट ऑफीसदेखील आपल्याला भरपूर योजना देऊ करते, ज्यामध्ये सुरक्षिततेसोबत मजबूत फायदादेखील दिला जातो.

अशातच पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पोस्ट ऑफिसचे ग्राहक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतील.

विभागाने 17 मे 2022 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की NEFT सुविधा 18 मे पासून आणि RTGS सुविधा 31 मे 2022 पासून उपलब्ध होईल. म्हणजेच, एखाद्याला पैसे पाठवणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.

पोस्ट ऑफिसने आपल्या अधिसूचनेत काय म्हटले आहे? जारी केलेल्या परिपत्रकात पोस्ट ऑफिसमध्ये एनईएफटीची सुविधा सुरू झाल्याचे म्हटले आहे. आरटीजीएसच्या सुविधेबाबत सध्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ही सुविधा 31 मे 2022 रोजी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

RTGS आणि NEFT म्हणजे काय? RTGS ही निधी हस्तांतरित करण्याची एक जलद प्रक्रिया आहे. या प्रणालीद्वारे तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. RTGS चे पूर्ण रूप म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट.

जर RTGS आणि NEFT मध्ये फरक पाहीला, तर दोन्हीचे काम म्हणजे बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करणे. जिथे NEFT मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची मर्यादा नाही, तिथे RTGS मध्ये तुम्हाला किमान दोन लाख रुपये ट्रान्सफर करावे लागतील.

NEFT मधील निधी दुसर्‍या खात्यात पोहोचण्यास थोडा वेळ लागतो, परंतु RTGS मध्ये तो लगेच पोहोचतो. आम्ही तुम्हाला सांगतो, ही सुविधा 24×7×365 असेल.

NEFT ची फी किती असेल

10 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी – 2.50 रुपये आणि जीएसटी

10 हजार ते 1 लाख रुपये – 5 रुपये आणि जीएसटी

1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत – 15 रुपये आणि

2 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी जीएसटी – 25 रुपये आणि GST