Multibagger Stock :मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. बिर्ला ग्रुपच्या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ही कंपनी Xpro India Limited (Xpro India) आहे.

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना 6,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉक एक्सप्रो इंडिया आता शेअरधारकांना लाभांशासह बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे.

गुरुवारी 26 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Xpro इंडियाचे शेअर्स रु. 1060 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. कंपनी 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देईल.

मल्टीबॅगर Xpro इंडियाच्या बोर्डाने 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 2 शेअर्स आहेत त्यांना 1 बोनस शेअर मिळेल.

याव्यतिरिक्त, कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रति शेअर 2 रुपये लाभांशाची शिफारस केली आहे. Xpro India ही बिर्ला समूहाची कंपनी आहे. ही एक वैविध्यपूर्ण बहु-विभागीय, बहु-स्थानिक कंपनी आहे.

2 वर्षांत 1 लाख रुपये 70 लाख झाले,:-  3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर Xpro इंडियाचे शेअर्स 15.15 रुपयांच्या पातळीवर होते. 26 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर रु. 1060 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत.

कंपनीच्या शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 6400 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 एप्रिल 2020 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या हे पैसे 70 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 126.70 रुपये आहे. त्याच वेळी, Xpro इंडिया शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1674 रुपये आहे.