Fixed Deposit : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँका सध्या आपले व्याजदर वाढवत आहेत. अशातच मागच्या काही दिवसात अनेक बॅंकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलेली आहे.

FD मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असते आणि परतावाही आधीच ठरलेला असतो.

अशातच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (SFB) ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेचे नवीन दर 19 में 2022 पासून लागू झाले आहेत.

आता बँक त्यांच्या FD वर 2.90 टक्के ते 6.00 टक्के व्याज देत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3.4 टक्के ते 6.5 टक्के व्याज मिळत आहे.

आता 990 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर सर्वसामान्यांना सर्वाधिक 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.60 टक्के व्याज मिळत आहे. बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करत आहे.

आता तुम्हाला इतके व्याज मिळेल
7 दिवस ते 29 दिवस 2.90 %
30 दिवस ते 89 दिवस 3.50%
90 दिवस ते 179 दिवस- 4.25%
6 महिने 5.00%
6 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 9 महिन्यांपेक्षा कमी 4.75%
9 महिने 5.05%
9 महिन्यांपेक्षा जास्त परंतु 12 महिन्यांपेक्षा कमी 6.50%
12 महिने 6.50%
12 महिने आणि 1 दिवस ते 15 महिने 6.00%
15 महिने आणि 1 दिवस ते 18 महिने 6.75%
18 महिने आणि 1 दिवसापासून परंतु 24 महिन्यांपेक्षा कमी 6.60%
24 महिने 6.90%
24 महिने आणि 1 दिवस ते 989 दिवस 6.50%
990 दिवस- 7.10%
991 दिवस ते 36 महिने 6.50%
3 वर्षे आणि 1 दिवस ते 5 वर्षे 6.25%
5 वर्षे आणि 1 दिवस ते 10 वर्षे 6.00%
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजदर 0.50%
उज्जीवन स्मॉल फायनान्स बैंक 19 मे 2022 पासून 7 ते 29 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 2.90 टक्के व्याज देत आहे. बँक आता 30 दिवस ते 89 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 3.50 टक्के आणि 4.25 टक्के व्याज देईल.
90 दिवस ते 179 दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 4.25 टक्के व्याज द्यावे लागेल. नियमित ग्राहकांना आता 6 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5.00 टक्के आणि 6 महिने ते 9 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 4.75 टक्के व्याज मिळेल.