file photo

Electric scooter :पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. Greta Electric ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Greta Harper ZX Series-I भारतात 4,1999 हजार रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केली आहे.

स्कूटरमध्ये अनेक पर्यायी बॅटरी आणि चार्जर आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या 6 रंगांच्या पर्यायांसह बाजारात दाखल करण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, सिटी आणि टर्बो या तीन राइडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे. इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100km आहे, तथापि, सिटी आणि टर्बो मोडमध्ये त्याची रेंज 80km आणि 70km आहे.

वैशिष्ट्ये या स्कूटरमध्ये डीआरएल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, फाइंड माय व्हेईकल अलार्म,

वन यूएसबी पोर्ट (यूएसबी 2.0) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्कूटरला 3वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. नवीन स्कूटरची टोकन रक्कम 2000 रुपयांसह बुकिंग सुरू झाली आहे. बुकिंग क्रमानुसार स्कूटर 45-75 दिवसांत डिलिव्हरी केली जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे.