Electric Hero Splendor :  पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) वाढत्या किमतींमुळे लोकांच्या खिशावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनाचा (electric vehicle) पर्याय स्वीकारू लागले आहेत.

मात्र, इलेक्ट्रिक वाहनांची किंमतही जास्त आहे. अशा परिस्थितीत लोक इलेक्ट्रिक वाहने घेण्यास टाळाटाळ करतात. पण आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक वाहनाचा आनंद घेऊ शकाल.

जर तुमच्याकडे जुनी Hero Splendor बाईक असेल तर तुम्ही ती अगदी कमी किंमतीत इलेक्ट्रिक बनवू शकता. एका कंपनीने इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार केले आहे. ते बाजारात सहज उपलब्ध होईल. हिरो स्प्लेंडर बाईकसाठी हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार करण्यात आले आहे.

आता तुमच्याकडे हिरो स्प्लेंडरची जुनी बाइक असेल तर तुम्ही ती इलेक्ट्रिक बनवू शकता. इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 37000 रुपये खर्च करावे लागतील. मात्र, ही बाईक पूर्णपणे तयार करण्यासाठी सुमारे 60 हजारांचा खर्च येणार आहे. या 60 हजारांमध्ये बॅटरी, किट आणि आरटीओच्या खर्चाचा समावेश असेल. हे इलेक्ट्रिक मुंबई स्थित कंपनी GoGoA1 ने बनवले आहे. सध्या हे किट फक्त Hero Splendor बाईकसाठी बनवण्यात आले आहे, पण लवकरच ते सर्व बाईकसाठी उपलब्ध होईल. त्याला आरटीओकडून मंजुरीही मिळाली आहे.

इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडर फीचर्स

हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट हब मोटरला जोडलेले आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक किटसोबत रिजनरेटिव्ह कंट्रोलर, बॅटरी एसओसी, युनिव्हर्सल स्विच, ड्रम ब्रेक, थ्रॉटल, वायरिंग हार्नेस, कंट्रोल बॉक्स, डीसी ते डीसी कनेक्टर, स्विंग आर्म आणि अँटी थेफ्ट उपकरण दिले आहे.

हे हब मोटरशी जोडले जाऊ शकते, जे बाइकला उर्जा देईल. ही ब्रशलेस मोटर 2000W ची आहे, जी 63Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडर बॅटरी किटमध्ये 72V 40AH लोथियम-आयन बॅटरी पॅक आणि चार्जिंगसाठी 72v 10amp चार्जर आहे.

आता सर्वकाही एकत्र घेतल्यास त्याची किंमत 55,606 रुपये असेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॅटरी भाड्याने घेऊ शकता. माहितीनुसार, पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 151 किमीची रेंज देईल.