Electric Car : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत दरम्यान आज आपण या लेखात आपण त्या ब्रँडच्या वाहनांबद्दल बोलणार आहोत ज्यांना सर्वत्र खूप पसंती दिली जाते.

होय, आम्ही मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड अर्थात MSIL बद्दल बोलणार आहोत.मारुती मोठ्या गुंतवणुकीसह हरियाणातील खरखोडा येथे आपला नवीन उत्पादन कारखाना उभारणार आहे.

कंपनीचा हा प्लांट सुमारे 900 एकरमध्ये उभारला जाणार आहे. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की मारुती सुझुकी या दशकाच्या मध्यापर्यंत (2025) खरखोडा येथे आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन सुरू करेल.

खरखोडा येथील कंपनीच्या प्लांटमध्ये 100 एकर जमीन बाइक बनवण्यासाठी वापरली जाणार आहे. तर उर्वरित 800 एकरमध्ये मारुती इलेक्ट्रिक वाहने बनवणार आहे. मारुतीच्या या प्लांटच्या माध्यमातून हरियाणातील तरुणांनाही रोजगार मिळणार आहे. यासोबतच जवळपास 75 टक्के रोजगाराच्या संधीही या परिसरात वाढणार आहेत.

मारुतीच्या कारखान्यात सुमारे 11 हजार तरुणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. तर मोटारसायकल क्षेत्रात सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना काम दिले जाणार आहे.

मारुती कंपनीने सांगितले की, नवीन कारखान्याचा पहिला टप्पा 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याची उत्पादन क्षमता प्रति वर्ष 2.5 लाख युनिट्स असेल. नवीन कारखान्याच्या उभारणीसंदर्भातील प्रशासकीय मान्यता घेणे बाकी आहे.

MSI ने सांगितले की ते प्लांटच्या पहिल्या टप्प्यावर 11,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल. भविष्यात सोनपत कारखान्यात क्षमता विस्तारासाठीही जागा उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

यासोबतच कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बॅटरी उत्पादनाचा नवीन कारखाना सुरू करण्यासाठी 7,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक फर्स्ट व्हेइकल भारतीय आणि जागतिक बाजारपेठेसाठी मध्यम आकाराची SUV असण्याची अपेक्षा आहे.

तसेच ते बनवण्यासाठी टोयोटाची मदत घेतली जात आहे. एवढेच नाही तर जपानी ब्रँडने ईव्ही आणि इतर घटकांच्या निर्मितीसाठी कर्नाटक सरकारसोबत करारही केला आहे.

नवीन कारखान्याचा पहिला टप्पा 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याची उत्पादन क्षमता प्रति वर्ष 2.5 लाख युनिट्स असेल. नवीन कारखान्याच्या उभारणीसंदर्भातील प्रशासकीय मान्यता घेणे बाकी आहे.

MSI ने सांगितले की ते प्लांटच्या पहिल्या टप्प्यावर 11,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल. भविष्यात सोनपत कारखान्यात क्षमता विस्तारासाठीही जागा उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे मारुतीच्या सगळ्या कार इलेक्ट्रिक होऊ शकतात. यात मारूती अल्टोचाही समावेश असेल.