DA Hike :  देशात सणासुदीला (festive season) सुरुवात झाली आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central employees) एक मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे त्यांना मिळणाऱ्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. DA (DA Hike) वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याची चर्चा सुरू होती.

डीए 34 वरून 38 टक्के झाला

सरकारने यापूर्वी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता, जो 1 जानेवारी 2022 पासून लागू आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आता त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली असून, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के झाला असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या पगारवाढीवर दिसून येईल. तुम्हाला सांगतो की, बऱ्याच काळानंतर केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये आणखी 3 टक्के वाढ देऊन ते 31 टक्के करण्यात आले.

पगार किती वाढणार?

सध्याच्या महागाईचे आकडे पाहता सरकारने डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए हा त्यांच्या आर्थिक सहाय्य वेतन संरचनेचा भाग आहे. गणनेनुसार, सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के केला आहे.

अशा परिस्थितीत कर्मचार्‍याचे मूळ वेतन आता 18000 रुपये असेल, तर 34 टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता 6,120 रुपये होतो. त्याच वेळी, या 4 टक्के वाढीनंतर, त्यांना मिळणारा डीए 6,840 रुपये होईल.