Krushi news :हिमालयात पिकणाऱ्या सफरचंदाची रोपे एका तरुण शेतकऱ्याने भोरच्या काळ्या मातीत लावली. त्यानंतर योग्य नियोजन करत खताची मत्रा दिल्याने आता या झाडांना फळे देखील लागली आहे.

त्यामुळे काळ्या मातीत सफरचंदाची शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे . संदीप शेटे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यानी दोन वर्षापूर्वी हिमाचल प्रदेश शिमला येथून हार्मोन ९९ या सफरचंद जातीच्या १५ रोपांची साधारणपणे १५ बाय १५ अंतरावरती रोपांची लागवड केली.

संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने झाडांची जोपासना केली सर्व झाडांना ठिबक सिंचन करुन पाणी दिले झाडे लावल्यानंतर सुरुवातीचा बहर न घेता अजून एक दुसऱ्या वर्षी झाडाची उंची सात ते आठ फूट झाली त्यानंतर जो फुलांचा बहर आला त्यावेळी फळे घेण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी साधारण २५ हजार रुपये खर्च झाला आहे. हिमालयातील हिमाचल प्रदेश,जम्मू शिमला येथे थंड हवेत येणारी सफरचंद भोरच्या काळ्या यशस्वी करून दाखवली असून पुढील वर्षी 3 एकर जागेत सफरचंद लागवड करणार असल्याचे शेतकरी संदीप संदीप (बाबू) शेटे यांनी सांगितले.

दोन वर्षानंतर झाडांना चांगल्या प्रकारचे सफरचंद लागले आहेत आणि झाडाची ही पूर्ण वाढ झाली असून साधारण या झाडांना वर्षभरत २०० तास थंडी लागते आणि ती मागील वर्षी चांगल्या प्रकारे मिळा ल्या ने झाडाची पूर्ण वड होऊन योग्य देखभाल केल्याने यंदा उतम प्रकारे सफरचंद लागली आहेत एक झाडाला ३०ते ४० सफरचंद आली आहेत. शेतकऱ्याच्या या प्रयोगाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.