Best Mileage Bike : ग्राहकांच्या आवडीनुसार भारतीय बाजारात एकापेक्षा एक बाइक्स उपलब्ध आहे मात्र तरीही देखील एंट्री लेव्हल बाइक्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मागच्या काही दिवसांपासुन मार्केटमध्ये 110cc बाइक्सची झपाट्याने वाढत आहे. यातच तुम्ही देखील 100 किलोमीटरचा प्रवास करत असाल ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही काही बेस्ट बाइक्सची लिस्ट घेऊन आले आहे जे मायलेजमध्ये सर्वात बेस्ट आहे.

TVS Sport (मायलेज: 110kmpl)

TVS स्पोर्टला 110cc बाईक सेगमेंटमध्ये खूप पसंती दिली जाते, ती स्टाइलसह उत्तम परफॉर्मन्स देते. त्याचे इंजिन देखील खूप किफायतशीर आहे आणि जे उत्तम मायलेज देते. TVS Sport मध्ये 110cc इंजिन आहे जे 8.29PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ET-Fi तंत्रज्ञानाच्या मदतीने ही बाईक 15 टक्के अधिक मायलेज देते.

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार या बाईकने मायलेजचा नवा विक्रम केला आहे. रेकॉर्डनुसार, TVS Sport एका लिटरमध्ये 110.12 kmpl मायलेज देते. बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. या बाईकमध्ये 10 लिटरची इंधन टाकी आहे. बाईकमध्ये बसवलेले फ्रंट आणि रिअल सस्पेंशन चांगले आहेत, जे खराब रस्त्यावर त्यांचे काम सहज करतात.

बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. बाईकचे वजन 110 किलोग्रॅम आहे आणि तिचा ग्राउंड-क्लिअरन्स 175 मिमी आहे. या बाईकची डिजाइन स्पोर्टी असून तिची सीटही आरामदायी आहे. TVS स्पोर्टची किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते.

Bajaj Platina 110 (मायलेज: 104kmpl)

बजाज प्लॅटिना 110 ही त्याच्या विभागातील सर्वात लोकप्रिय बाइक आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 115 cc 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळते, जे 8.6 PS पॉवर आणि 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या इंजिनमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्ल्यू इंजेक्शन सिस्टम देखील आहे.

ARAI च्या मते, ही बाईक 104 Kmpl मायलेज देते. या बाइकमध्ये क्विल्टेड सीट्स, नायट्रोक्स स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशन, इंटिग्रेटेड डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प आणि ट्यूबलेस टायर्स यांसारखी फीचर्स पाहायला मिळतात. उत्तम ब्रेकिंगसाठी, 240 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक समोर ABS सुरक्षा फीचर्ससह प्रदान केले आहे तर ड्रम ब्रेक त्याच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 69,216 रुपयांपासून सुरू होते.

Hero HF 100 (मायलेज: 67 kmpl)

Hero MotoCorp ची HF 100 ही त्याच्या विभागातील सर्वात स्वस्त बाइक आहे. त्याची एक्स-शो रूम किंमत 51 हजार रुपये आहे. ARAI च्या मते, ही बाईक 67 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. या बाईकमध्ये इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह 97.2cc इंजिन आहे, जे 8.36 PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकमध्ये मेटल ग्रॅब रेल, ब्लॅक थीमवर आधारित एक्झॉस्ट, क्रॅश गार्ड, अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्स यांसारखी फीचर्स आहेत. बाईकचा लूक सुधारण्यासाठी त्यात नवीन ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.

या बाईकमध्ये 9.1 लीटर क्षमतेची इंधन टाकी आहे. त्याची ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी आहे. बाईकच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. Hero HF 100 ची किंमत 55,450 रुपये (एक्स-शोरूम किंमत) पासून सुरू होते.

हे पण वाचा :-  BS4 vs BS6: BS4 आणि BS6 मध्ये काय आहे फरक; जाणून घ्या एकमेकांपासून किती आहेत वेगळे